Supreme Court : मोहम्मद झुबेर यांच्याविरोधातील कारवाईला स्थगिती, उत्तर प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका

झुबेर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत योगी सरकारची कडक शब्दांत कानउघाडणी केली.

Supreme Court : मोहम्मद झुबेर यांच्याविरोधातील कारवाईला स्थगिती, उत्तर प्रदेश सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका
ईडब्ल्यूएस आरक्षणाचे काय होणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 1:26 AM

नवी दिल्ली : ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर (Mohammad Zuber) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने सोमवारी चांगलेच फटकारले. यावेळी झुबेर यांच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या सर्व सहाही एफआयआर (FIR) आणि कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय उत्तर प्रदेशच्या योगी सरकारसाठी मोठा झटका मानला जात आहे. मोहम्मद झुबेर यांच्याविरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करण्याची ही कार्यपद्धती अस्वस्थ करणारी आहे, अशी नाराजी व्यक्त करत न्यायालयाने योगी सरकारला नोटीसही बजावली आहे.

एक-दोन दिवसांत सुनावणी घेऊ – न्यायालय

झुबेर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत योगी सरकारची कडक शब्दांत कानउघाडणी केली. उत्तर प्रदेश सरकारने झुबेर यांच्याविरोधात तूर्त कोणतीही करू नये, असे न्यायालयाने बजावले. झुबेर यांच्या अंतरिम जामिनाच्या अर्जावर आम्ही एक-दोन दिवसांत सुनावणी करू, तोपर्यंत कुठलीही कारवाई करू नका. तसेच इतर कोणत्याही न्यायालयाने घाईघाईने कोणताही आदेश देऊ नये, असे खंडपीठाने यावेळी नमूद केले. झुबेर यांनी सर्व एफआयआर रद्द करण्याची मागणी करीत अंतरिम जामीनासाठी अर्ज केला आहे. तसेच तपासासाठी एसआयटी नेमण्याच्या योगी सरकारच्या निर्णयालाही आव्हान दिले आहे. याप्रकरणी आता 20 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

एका प्रकरणात जामीन, मग दुसर्‍या प्रकरणात अटक कशी?

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने योगी सरकारच्या कारवाईवर प्रश्नांचा भडिमार केला. झुबेर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व एफआयआरमधील तथ्य सारखेच आहे. मग एका प्रकरणात जामीन मंजूर केला जातो आणि दुसर्‍या प्रकरणात अटक कशी काय केली जाते? हे एक प्रकारचे दुष्ट वर्तुळ वाटत आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी खंडपीठाने यावेळी केली. (The Supreme Court reprimanded Uttar Pradesh for filing cases against Mohammad Zubair)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.