बटाट्यात निघाला विष्णूचा १० वा अवतार, लोकांच्या दर्शनासाठी लागल्या रांगा…पाहा कुठे घडली घटना
आपल्या येथे मध्यंतरी गणपती दूध पित असल्याची अफवा पसरली होती. तेव्हा तर मोबाईलचा जमानाही आजच्या इतका नव्हता, मोबाईल नसल्यातच जमा होते. परंतू आता उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक हैराण करणारे प्रकरण घडले आहे.

युपीच्या संभल येथील वंश गोपाल तीर्थ येथे अजब प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका बटाट्यात चक्क विष्णूचा दहावा अवतार प्रकट झाला आहे. या बटाट्यातून एक नव्हे तर विष्णूचे चार अवतार बाहेर पडले आहेत. या बटाटयाला पाहाण्यासाठी लांबून लोक येत आहेत. आणि त्याच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. या बटाट्याला दर्शनासाठी शंकर कॉलेजजवळील तुलसी मानस मंदिरात ठेवण्यात आले आहे. येथे श्रद्धाळूंची तोबा गर्दी झाली आहे.
हा बटाटा चमत्कारी आहे
मंदिराच्या पुजाऱ्याने म्हटले आहे की हा बटाटा वंश गोपाल तीर्थ जवळील कैमा गावात आढळला आहे. यात भगवान विष्णूच्या अवतारांची आकृती पाहायला मिळत आहे. हा बटाटा चमत्कारी आहे. यात देवाची शक्ती आहे असे मानले जात आहेत. या बटाट्यास पाहण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी लोक लांबून लांबून येत आहेत. हा बटाटा जणू एक आस्थेचे केंद्र बनला आहे. लोक या बटाट्याचे दर्शन घेण्यासाठी त्याची पूजा करण्यासाठी मंदिरात पोहचत आहेत.
फुलांचा हार घालून प्रतिष्ठापना
तुलसी मानस मंदिरात बटाट्यास फुलांचा हार घालून त्याची प्रतिष्ठापना केली आहे.या बटाट्यास देवाचा अंश मानले जात असून त्याची पूजा केली जात आहे. मंदिराच्या पूजाऱ्याने ही देवाची अगाध लीला आहे. जी या वर्षी आनंदाचा नवी संधी घेऊन आली आहे. बटाट्यात भगवान विष्णूच्या आकृतीत भगवान नंदी, भोले, कासव, मासा आकृती स्पष्टपणे दिसत आहेत.
देवाची अपरंपार लीला
भगवान कल्की हे उत्तर प्रदेशातील संभलमध्येच आपला अवतार घेतील, जो विष्णूचा दहावा अवतार असेल, याचा उल्लेख वेद आणि पुराणात आहे. आता भगवान यांची आकृती असलेल्या बटाट्याला मंदिरात राम दरबारात ठेवले आहे. श्रद्धाळू तेथे पोहचत आहेत. आणि दर्शन घेऊन पूजा करीत आहेत. हा बटाटा आता लोकांच्या आस्थेचा विषय बनला आहे. आता मंदिराच्या भटजीने देखील आता या बटाट्यास देवाची अपरंपार लीला म्हटले जात आहे.
