काँग्रेसचं ठरलं..! आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने शड्डू ठोकला…

नियुक्त केलेले राज्यपाल ओबीसींच्या आरक्षणात वाढ करण्याची जी फाईल आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व विषय घेऊन 2024 ची निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काँग्रेसचं ठरलं..! आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने शड्डू ठोकला...
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 10:43 PM

नवी दिल्ली : आगामी काळातील निवडणुकांना अजून बराच अवधी आहे, तरीही देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच कर्नाटकात काँग्रेसने विजयावर आपली मोहर उमटवली असल्याने आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने ओबीसींच्या मुद्यावरून शड्डू ठोकला आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी ओबीसींच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय लढाई अधिक रंजक बनली आहे. भाजपने केलेल्या या हल्ल्यानंतर काँग्रेसने आता भाजपला ओबीसीविरोधी ठरवले आहे. त्यातच काँग्रेसकडून सातत्याने जातीनुसार जनगणना करण्याची मागणीही केली आहे.

त्यासोबतच आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवरून वाढवण्याची मागणी करून भाजपला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्साठी आता या पक्षांनी जोरदारपणे कंबर कसली आहे.

काँग्रेसची अश्वासनं

येणाऱ्या निवडणुकीसाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून आता राष्ट्रीय ओबीसी अधिवेशन भरवण्याची तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील ओबीसींच्या मागण्यांची यादी प्रत्येक राज्यातील ओबीसी विभागाकडून मागविण्यात आली असून, काँग्रेसने दिलेली अश्वासने आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

त्याचबरोबर क्रिमी लेयरची मर्यादाही 8 लाखांवरून वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून केंद्र सरकारकडे ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करत आहे.

भाजप ओबीसीविरोधी

काँग्रेसकडून आता आगामी निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्या चार ओबीसींपैकी तीन मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपला ओबीसीविरोधी बनवण्याचा काँग्रेसचा सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

त्यासाठी झारखंड आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या राज्य सरकारने ओबीसी आरक्षण 14 टक्क्यांवरून 27 टक्के केले आहे मात्र तो निर्णय आता राज्यपालांनी थांबवला आहे.

फाईल  थांबवण्याचा प्रयत्न

या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते आणि झारखंड काँग्रेसचे माजी अध्यक्षांनी सांगितले की, भाजपच्या लोकांना जात जनगणना नको आहे. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल ओबीसींच्या आरक्षणात वाढ करण्याची जी फाईल आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व विषय घेऊन 2024 ची निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसीचा मुद्दा हा आगामी काळातील निवडणुकीसाठी मोठी भूमिका बजावणारा ठरणारा आहे.

Non Stop LIVE Update
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.