AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी 3.0 : मोदींच्या कॅबिनेटमधील सर्वांत धनवान मंत्री कोण ? एकाकडे 5 हजार कोटींची संपत्ती तर…

Top 10 Richest Ministers in Modi 3.0 Union Cabinet : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवार ९ जून रोजी नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. मोदी सरकार 3.0 कॅबिनेटमधील अनेक मंत्री कोट्याधीश आहेत. कोणत्या मंत्र्यांची किती संपत्ती आहे, चला जाणून घेऊया..

मोदी 3.0  : मोदींच्या कॅबिनेटमधील सर्वांत धनवान मंत्री कोण ? एकाकडे 5 हजार कोटींची संपत्ती तर...
| Updated on: Jun 14, 2024 | 1:31 PM
Share

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारने 9 जून 2024 रोजी सत्तास्थापन केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएने 293 जागा जिंकल्या. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या आघाडीत टीडीपी, जेडीयू आणि इतर पक्षांचा समावेश आहे. रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळातील एकूण 71 मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. यामध्ये 31 कॅबिनेट मंत्री आहेत तर 35 राज्य आणि 5 राज्य स्वतंत्र मंत्री आहेत.

एनडीए सरकारच्या या सर्व मंत्र्यांमध्ये डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांची बरीच चर्चा झाली, त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेली अफाट संपत्ती. तेलगू देसम पक्षाचे पेम्मासानी चंद्रशेखर यांच्याकडे 5,705 कोटींची संपत्ती आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या ताज्या अहवालानुसार सध्याच्या लोकसभेतील विजयी उमेदवारांपैकी 93 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. या नव्या कॅबिनेटमधील सर्वात श्रीमंत 10 मंत्र्यांबद्दल जाणून घेऊया.

डॉक्टर चंद्र शेखर पेम्मासानी , पक्ष : तेलुगू देसम पार्टी (TDP)

पोर्टफोलिओ : ग्रामीण विकास राज्य मंत्री, कम्युनिकेशन राज्य मंत्री लोकसभा : विजयवाडा, आंध्र प्रदेश

डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे मोदींच्या कॅबिनेटमधील आणि संसदेतील सर्वात श्रीमंत सदस्य आहेत. 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पेम्मासानी यांच्याकडे 5705 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पेम्मासानी यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर मतदारसंघात वायएसआरसीपीच्या किलारी वेंकटचा पराभव केला. त्यांना ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयाचे राज्यमंत्री करण्यात आले आहे.

ज्योतिरादित्य एम. सिंधिया, पक्ष : भारतीय जनता पार्टी (BJP)

पोर्टफोलिओ : दूरसंचार मंत्री, ईशान्य विकास

लोकसभा : गुना, मध्य प्रदेश

ज्योतिरादित्य सिंधिया हे ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील आहेत. त्यांच्याकडे 425 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. मोदी मंत्रिमंडळातील ते दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मंत्री आहेत. 2020 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले सिंधिया राज्यसभेवर निवडून आले आणि 2021 मध्ये त्यांना विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री बनवण्यात आले. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना ईशान्य क्षेत्र विकास आणि दूरसंचार मंत्री करण्यात आले आहे.

एच.डी. कुमारस्वामी, पक्ष : जनता दल (सेक्युलर)

पोर्टफोलिओ: अवजड उद्योग आणि स्टील

लोकसभा : चन्नापटना, कर्नाटक

एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 217 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. चन्नापटना लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या एचडी कुमार स्वामी यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालय आणि स्टील मंत्रालयाची जबाबदारी आली आहे.

अश्विनी वैष्णव, पक्ष : भारतीय जनता पार्टी (BJP)

पोर्टफोलिओ: रेल्वे, माहिती व प्रसारण , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

लोकसभा : ओदिशा

अश्विनी वैष्णव ओडिशाचे खासदार आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 144 कोटी रुपये आहे. 2019 पासूनचे भाजपचे राज्यसभा खासदार असलेल्या वैष्णव यांना यावेळीही रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राव इंद्रजीत सिंह, पक्ष : भारतीय जनता पार्टी (BJP)

पोर्टफोलिओ: सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन आणि सांस्कृतिक मंत्रालय

लोकसभा: गुडगांव, हरियाणा

गुडगावचे खासदार आणि दिग्गज नेते राव इंद्रजित सिंग यांनी आपली संपत्ती १२१ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये गुडगावची जागा जिंकणारे राव इंद्रजीत हे या मंत्रिमंडळात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन आणि सांस्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी सांभाळतील.

पीयूष गोयल, पक्ष : भारतीय जनता पार्टी (BJP)

पोर्टफोलिओ: वाणिज्य आणि उद्योग मंत्री

लोकसभा: मुंबई उत्तर

पियुष गोयल यांची संपत्ती 110 कोटींहून अधिक आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली आणि त्यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्री करण्यात आले.

अमित शाह, पक्ष : भारतीय जनता पार्टी (BJP)

पोर्टफोलिओ: गृहमंत्री

लोकसभा: गांधी नगर, गुजरात

भाजपचे ज्येष्ठ नेते शहा यांच्याकडे सुमारे 65 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून ते विजयी झाले आणि 2019 च्या मंत्रिमंडळाप्रमाणे यावेळीही त्यांना गृहमंत्रीपद मिळाले आहे. यावेळी ते सहकार मंत्रालयाची जबाबदारीही पाहणार आहेत.

कृष्ण पाल गुर्जर, पक्ष : भारतीय जनता पार्टी (BJP)

पोर्टफोलिओ: सहकार

लोकसभा: फरीदाबाद, हरियाणा

कृष्णा पाल गुर्जर यांच्याकडे एकूण 62 कोटींची संपत्ती आहे. ते फरिदाबादमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्याने 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग विजय मिळवला आहे. कृष्ण पाल गुर्जर यांना मोदी 3.0 मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री बनवण्यात आले आहे.

वी. सोमन्ना, पक्ष : भारतीय जनता पार्टी (BJP)

पोर्टफोलिओ: जलशक्ती आणि रेल्वे

लोकसभा: गोविंदराज नगर, कर्नाटक

व्ही.सोमन्ना कर्नाटकातील गोविंदराज नगरमधून भाजप खासदार म्हणून निवडून आले. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री करण्यात आले आहे.

पंकज चौधरी, पक्ष : भारतीय जनता पार्टी (BJP)

पोर्टफोलिओ: अर्थ राज्यमंत्री

लोकसभा: महाराजगंज, उत्तर प्रदेश

पंकज चौधरी यांच्याकडे 41 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. महाराजगंजमधून निवडणूक जिंकलेल्या पंकज चौधरी यांना 2024 मध्ये अर्थ राज्यमंत्री बनवण्यात आले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.