AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही दोन झाडं म्हणजे सापांचे पक्के मित्र; जणू सापांचं दुसरं घरच, बागेत कधीच लावू नका

अशी काही झाडं असतात, ज्या झाडांच्या नैसर्गिक रचनेमुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. युटा स्टेट युनिव्हर्सिटी एक्सटेंशनच्या एका अहवालानुसार सापांना जिवंत राहण्यासाठी ठंड, ओलसर आणि सुरक्षित जागेची गरज असते.

ही दोन झाडं म्हणजे सापांचे पक्के मित्र; जणू सापांचं दुसरं घरच, बागेत कधीच लावू नका
SNAKEImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 9:27 PM
Share

अनेकांना बागकामाची आवड असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बागेत विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडं लावण्यासाठी अनुकूल वातावरण असतं, त्यामुळे लोक आपल्या बागेत विविध प्रकारची सुंदर सुंदर फुलांची, फळांची आणि शोभेच्या झाडांची लागवड करतात. मात्र तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? की काही झाडं अशी देखील असतात, ज्यामुळे साप तुमच्या बागेमध्ये येऊ शकतो. ही झाडं सापांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. अनेकदा असा दावा केला जातो की काही विशिष्ट वनस्पतीच्या वासामुळे किंवा फुलांच्या सुवासामुळे साप अशा वनस्पतींकडे आकर्षित होतात. परंतु हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर मग साप या झाडांकडे का आकर्षित होतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तज्ज्ञांच्या मतानुसार कोणत्याही झाडाच्या सुवासामुळे साप त्या झाडाकडे आकर्षित होत नाही, तर त्या झाडांची नैसर्गिक रचनाच अशी असते की सापांना त्या झाडाजवळ आश्रय घेण्यासाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे साप अशा झाडांकडे आकर्षित होतात.

युटा स्टेट युनिव्हर्सिटी एक्सटेंशनच्या एका अहवालानुसार सापांना जिवंत राहण्यासाठी ठंड, ओलसर आणि सुरक्षित जागेची गरज असते. या झाडांखाली सापांना तसं वातावरण नैसर्गिकरित्या तयार होतं. त्यामुळे साप कायम अशा झाडांच्या आसपास राहतात. तसेच पावसाळ्यामध्ये जमिनीवर पसरणाऱ्या ज्या वेली असतात, अशा वेलींच्याभोवती तसेच ओलसर जागेमध्ये बेडूक देखील आढळतात, बेडूक हे अनेक प्रजातीच्या सापांचं मुख्य खाद्य आहे, त्यामुळे साप हे बेडूक आणि ओलसर जागेत निर्माण झालेले इतर कीटक खाण्यासाठी देखील अशा ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे अशा झाडांकडे साप नेहमी आकर्षित होतात. अशा झाडांखाली सापांचा डेरा असतो.

सर्वासाधारणपणे लेमन ग्रास सारख्या ज्या वनस्पती असतात, त्या वनस्पतींची वाढ प्रचंड झपाट्याने होते. लेमन ग्रास जेव्हा वाढतं तेव्हा त्याच्या मुळापर्यंत सूर्य प्रकाश पोहोचू शकत नाही. त्यामुळे अशा झाडांच्या मुळाशी नेहमी थंड आणि ओलसर वातावरण असतं. तसेच अंधार असल्याने सापांसाठी सुरक्षित जागा असते, त्यामुळे अशा झाडाखाली नेहमी तुम्हाला साप दिसून येतात. लेमन ग्रासप्रमाणेच जुईचं झाडं देखील सापांचं आवडतं आश्रयस्थान असतं.

सापांपासून वाचाण्यासाठी काय करायचं?

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. सापांपासून वाचण्यासाठी आपली बाग नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. बागेमध्ये गवत वाढू दिलं नाही पाहिजे. तसेच बागेत कुठेही दलदल निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. लेमन ग्राससारख्या वनस्पतींची वेळेवर छाटणी केली पाहिजे, त्या जास्त वाढू देता कामा नये.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ