
इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी शनिवारी मोठं विधान केलं आहे. आमचा देश सध्या परिस्थितीमध्ये अमेरिका, इस्रायल आणि यूरोपीयन देशांसोबत पूर्णपणे युद्धात अडकला आहे. सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची बैठक होणार आहे, त्याच्या दोन दिवस आधीच पेजेशकियन यांनी हे विधान केलं आहे. अल जजीराच्या एका रिपोर्टनुसार पेजेशकियन यांनी इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अधिकृत वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे विधान केलं आहे. मला वाटत की आम्हाला अमेरिका आणि इस्रायल यांनी युद्धात पूर्णपणे अडकवले आहे. आमचा देश कधीच स्वत:च्या पायावर उभा राहु नये असं त्यांना वाटतं, 1980 पासून इराकसोबत देखील हीच परिस्थिती आहे.
पुढे बोलताना पेजेशकियन यांनी म्हटलं की, त्या काळात परिस्थिती वेगळी होती, मिसाईल हल्ला होत होता आणि उत्तर कोणला द्यायचं याचा आम्हाला अंदाज देखील होता. मात्र सध्या अमेरिका, इस्रायल आणि युरोपीयन राष्ट्रांनी आम्हाला पूर्णपणे युद्धात अडकवलं आहे, त्यामुळे इथे परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, आज जो संघर्ष सुरू आहे, तो फक्त सैन्य संघर्ष नाहीये तर सांस्कृतिक, राजकीय, आणि सुरक्षेचा हा मुद्दा आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून आमच्यावर प्रत्येक क्षेत्रात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आम्ही चारही बाजूनं अडकलो असून, प्रत्येक वेळी आमच्यासाठी नव्या समस्या निर्माण केल्या जात आहे.
दरम्यान दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये बेंजामिन नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांना भविष्यात इराणकडून होणाऱ्या सभांव्य कारवाईच्या शक्यतेबाबत माहिती देऊ शकतात. मीडियामधून समोर येत असलेल्या बातमीनुसार इराण पुन्हा एकदा आपली शस्त्र क्षमता वाढवण्याच्या तयारीमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर आता इराणकडून मोठा दावा करण्यात आला आहे, आम्ही चारही बाजुन युद्धात अडकलो आहोत, असं इराणने म्हटलं आहे.