हे युग युद्धाचं नाही, पण दहशतवादाचेही नाही; मोदींनी पाकिस्तानला सुनावले
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड उत्तर भारताने पाकिस्तानला दिले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांचा जीव घेतला. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदू’च्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत पाकिस्तानला चांगलेच सुनावरले आहे.
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झालेली आहे. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण देशाला संबोधित केले. त्यांनी ‘हे युग युद्धाचं नाही, पण दहशतवादाचेही नाही’ असे म्हणत पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. वाचा: ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, DGMO पत्रकार परिषदेत माहिती समोर
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
आम्ही दशतवाद्यांच्या इशाऱ्यावर चालणारी सरकार आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगळं पाहणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने पाकिस्तानचा चेहरा पाहिला आहे. मारलेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानचे अधिकारी होते. स्टेट स्पॉन्सर्ड टेररीझमचा हा मोठा पुरावा आहे. भारत आणि आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने निर्णायक पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानात आम्ही पाकिस्तानला प्रत्येकवेळी धूळ चारली आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरने नवीन आयाम जोडला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पाकिस्तानला सुनावले
पुढे ते म्हणाले, ‘आम्ही डोंगर आणि रेतीच्या प्रदेशात आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. आपल्या मेड इन हत्याचारे ही महत्त्वाची ठरल्याचं आपण पाहिलं आहे. प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात आपल्या सर्वांनी एकजूट राहणं आपली एकता, आपली सर्वात मोठी शक्ती आहे. हे युग युद्धाचं नाहीये. पण हे युग आतंकवादाचंही नाहीये. टेररिझमच्या विरोधात झिरो टॉलरन्स ही एक चांगल्या जगाची गॅरंटी आहे.’