Tina Dabi Pradeep Gawande: माझ्या आईची अन् त्याची सबकास्ट एकच, टीनानं पहिल्यांदाच प्रदीपचे ‘बोनस’ पॉईंट्स सांगितले

Tina Dabi Pradeep Gawande: माझ्या आईची अन् त्याची सबकास्ट एकच, टीनानं पहिल्यांदाच प्रदीपचे 'बोनस' पॉईंट्स सांगितले
नेमकं प्रदीपबाबत टीनानं काय म्हटलं?
Image Credit source: TV9 Marathi

Tine Dabi Pradeep Gawande Love Story : टीना यांचे प्रेमसंबंध आपल्या महाराष्ट्राचे असलेल्या प्रदीप गावंडे यांच्याशी जुळले. दरम्यान, आपल्या लग्नाबाबत एका मुलाखतीत विचारणा झाल्यानंतर टीना डाबी यांनी आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या जातीवर महत्त्वाचं विधान केलंय.

सिद्धेश सावंत

|

Apr 01, 2022 | 3:22 PM

टीना डाबी आणि प्रदीप गावंडे(Tine Dabi & Pradeep Gawande) ! गेल्या काही दिवसांपासून ही दोन्हीही नावं चर्चेत आहेत. ही दोन्ही नावं चर्चेत असण्याला कारणंही खास आहे. दोघंही लग्न करणार आहेत. साखरपुडा नुकताच झाला आहे. दोघंही आएएस (IAS) अधिकारी आहेत. दोघांचंही पोस्टींग राजस्थानातच (Rajasthan) आहे. 20 एप्रिलला त्यांच्या लग्नाची गाठ बांधली जाईल. त्यांच्या लग्नाच्या चर्चा या एखाद्या सेलिब्रिटीच्या लग्नासारख्याच होत आहेत. त्यालाही मोठी पार्श्वभूमीवर आहे. पण आता टीना डाबी हीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबत म्हणजेच प्रदीप गावंडे यांच्याबाबत त्यांच्या जातीला घेऊन खास विधान केलं आहे. खरंतर, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच लग्न आणि लग्न करत असताना जोडीदाराची असणारी जात, हा चर्चेचा विषय ठरतो. अशात यावेळी तर टीना डाबीनं थेट होणाऱ्या नवऱ्याच्या जातीवर विधान केलेलं असल्यामुळे, त्याची चर्चा झाली नसती, तरच नवल!

View this post on Instagram

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

काय म्हणाल्या टीना डाबी?

टीना डाबी यांचा घटस्फोट झाल्यानंतर आता त्या आपल्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. अतहर आमीर खान या आएएस अधिकाऱ्यासोबत त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. पण नंतर टीना डाबी या अतहरसोबत विभक्त झाल्या. त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर त्यांचे प्रेमसंबंध आपल्या महाराष्ट्राचे असलेल्या प्रदीप गावंडे यांच्याशी जुळले. दरम्यान, आपल्या लग्नाबाबत एका मुलाखतीत विचारणा झाल्यानंतर टीना डाबी यांनी आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या जातीवर महत्त्वाचं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय, की…

आमच्या कुटुंबात सगळे खूश आहेत. प्रदीप माझ्याप्रमाणेत एससी कम्युनिटीचे आहेत. प्रदीपच्या आईप्रमाणेच माझी आईदेखील मराठी आहेत. माझी आणि आणि ते एकाच जातीचे आहेत.

कोण आहेत प्रदीप गावंडे?

प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी नाशिकच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण घेतलंय. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षाही उत्तीर्ण केली. नंतर त्यांचं पोस्टींग हे राजस्थानात झालं होतं. 2013 च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. सध्या प्रदीप यांच्याकडे राजस्थान आर्कियोलॉजी एन्ड म्युझिअम डिपार्टमेन्टचे ते डायरेक्टर आहेत. प्रदीप यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 साली झाला होता. टीना या प्रदीपपेक्षा 13 वर्षांनी लहान आहेत. टीना यांचं वय 28 वर्ष तर प्रदीप यांचं वय 41 इतकं आहे. या दोघांमध्य 13 वर्षांचं अंतर आहे.

View this post on Instagram

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

टीनाप्रमाणेच प्रदीप गावंडे यांचंही हे दुसरं लग्न असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, एकीकडे सोशल मीडियात एक्टीव्ह असणाऱ्या टीना डाबीसारखे प्रदीप हेही काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते. भ्रष्टाचाराच्या एका आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. एसीबीच्या पथकानं त्यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती.

View this post on Instagram

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

येणारे काही दिवस हे कपल चर्चेत असणार, यात शंका नाही. तब्बल चौदा लाख लोकं टीना डाबी यांनी इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. दोघेही राजस्थान केडरमध्ये सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या या लग्नाची प्रत्येक खास गोष्ट सगळ्यासाठीच चर्चेचा विषय ठरतेय.

View this post on Instagram

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

IAS आणि PCS व्हायचं असेल तर जाणून घ्या यांच्यातील फरक आणि यांचे मानधन!!

IAS टीना डाबींसोबत लग्नाच्या बेडीत अडकणारे कोण आहेत डॉ. प्रदीप गावंडे?

IAS Tina Dabi : IAS टीना डाबी होणार महाराष्ट्राची सुनबाई, दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार टीना, पोस्ट चर्चेत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें