TMC महिला खासदाराच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब, नुसरज जहांचा ‘बेबी बंप’ फोटो व्हायरल

प्रेम-लग्न-अफेअर यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या टीएमसीच्या खासदार नुसरत जहां आता पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळेसचं कारण आहे त्यांचा एक फोटो. नुसरत जहां (Nusrat Jahan) ह्या गरोदर असल्याचं वृत्त आधीच आलेलं होतं पण आता त्यांचा बेबी बंप असलेला फोटो व्हायरल झाला आहे.

TMC महिला खासदाराच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब, नुसरज जहांचा 'बेबी बंप' फोटो व्हायरल
nushrat Jahan

कोलकाता : प्रेम-लग्न-अफेअर यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या टीएमसीच्या खासदार नुसरत जहां आता पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळेसचं कारण आहे त्यांचा एक फोटो. नुसरत जहां (Nusrat Jahan) ह्या गरोदर असल्याचं वृत्त आधीच आलेलं होतं पण आता त्यांचा बेबी बंप असलेला फोटो व्हायरल झाला आहे. त्या सहा महिन्याच्या गरदोर असल्याचं सांगण्यात येत आहे (TMC MP Nusrat Jahan Flaunts Baby Bumb).

काय आहे त्या फोटोत?

नुसरज जहां यांचा हा फोटो देशभर व्हायरल होतोय. कारणही तसच आहे. निखिल जैन (Nikhil Jain) यांच्यासोबत झालेलं लग्न हे लग्न नव्हतं तर ते लिव्ह इन रिलेशनशिप (Live in relation) होती असा दावा नुसरत जहां यांनी केला आहे. लग्न तुर्कित केलेलं होतं आणि तिथल्या कायद्यानुसार ते अवैध असल्याचा दावा नुसरत जहां यांचा आहे. निखिल जैन यांच्यावर गंभीर आरोप करत नातं संपवल्याची घोषणाही नुसरत जहांनी केली आहे. हे सगळं चालू असतानाच. नुसरत जहां ह्या गरोदर असल्याचं वृत्त आलं. पती निखिल जैन यांनी आपण त्या बाळाचे बाप नसल्याचं जाहीर करुन टाकलं. निखिल जैन नाही तर मग कोण? असा सवाल पुन्हा चर्चिला जात असतानाच नुसरत जहां यांचं अभिनेता यश दासगुप्ता (Yash dasgupta) यांच्यासोबत अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. त्याच पार्श्वभूमीवर हा फोटो समोर आला आहे. ह्या फोटोत त्या सहा महिन्यांच्या गरोदर असल्याचं सांगितलं जात आहे. याच फोटोत बंगाली अभिनेत्री सरबंती चटर्जी
आणि इतर दोन मैत्रिणींसोबत नुसरत जहां दिसते आहे.

लव्ह-लग्न आणि लोच्या!

नुसरत जहां यांचं निखिल जैन ह्या उद्योगपतीशी दीर्घकाळ अफेअर होतं. नुसरतनी टीएमसीकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या निवडुणही आल्या. त्यानंतर लगेचच दोघांनी तुर्कीमध्ये धुमधडाक्यात लग्नही केलं. अवघ्या दोन वर्षात ह्या लग्नाला ग्रहण लागलं. गेल्या काही काळापासून नुसरत ह्या अभिनेता यश दासगुप्तासोबतच जास्त काळ दिसत असल्याची चर्चा होती. निखिल जैन यांच्यासोबतचं नातं संपल्याची घोषणाच नुसरत यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. एवढच नाही तर निखिल जैन हा त्यांच्या खात्यातून पैसे काढतो, त्याने दागिणे वगैरे सगळं ताब्यात ठेवल्याचा आरोपही
नुसरत जहां यांनी केला आहे.

TMC MP Nusrat Jahan Flaunts Baby Bumb

संबंधित बातम्या :

Photo : खासदार नुसरत जहांंच्या रिलेशनशिप आणि प्रेग्नेंसीची चर्चा, यशदास गुप्ता आहे तरी कोण?

Nusrat Jahan controversy: नुसरत जहांचं लग्न मोडलं, पतीवर गंभीर आरोप, 7 मोठ मोठे दावे, वाचा सविस्तर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI