Sitaram Bank : प्रभू श्रीरामांची अनोखी बँक; इतक्या वेळा ‘सीताराम’ लिहिल्यावरच उघडते खाते

Ramnavmi 2024 : आज रामनवमी, देशभरात उत्साह आहे. अयोध्यानगर तर रामनामाने दुमदुमून गेली आहे. प्रभू श्रीरामांच्या नगरीत एक अनोखी बँक आहे. या बँकेच्या शाखा केवळ देशातच नाही तर परदेशात पण आहेत. या बँकेत खाते उघडण्यासाठी तुम्हाला इतक्या लाख वेळा 'सीताराम' हे शब्द लिहावे लागतात.

Sitaram Bank : प्रभू श्रीरामांची अनोखी बँक; इतक्या वेळा 'सीताराम' लिहिल्यावरच उघडते खाते
प्रभू श्रीरामांची बँक, असे उघडा खाते
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 2:27 PM

देशभरात रामनवमीचा उत्साह आहे. यंदा अयोध्यानगरीत तर अभूतपूर्व जल्लोष आहे. आज प्रभू श्रीरामांची नगरी फुलांनी सजली आहे. प्राण प्रतिष्ठेनंतर पहिल्यांदाच अयोध्येत रामनवमी साजरी करण्यात येत आहे. रामलल्लाला आज दुपारी सूर्यांच्या किरणांचा टिळा लावण्यात आला. पण या रामनगरीत एक अनोखी बँक असल्याचे तुम्हाला माहिती आहे का? या बँकेचे नाव इंटरनॅशनल सीताराम बँक असे आहे. जाणून घ्या या बँकेची काय आहे विशेषतः

5 लाख वेळा लिहा सीताराम

प्रभू श्रीरामांच्या नगरीतील या बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला 5 लाख वेळा सीताराम असे लिहावे लागेल. या बँकेची स्थापना 1970 मध्ये झाली होती. या बँकेत भाविकांना राम नावाचे कर्ज मिळते. या बँकेत सध्या 35000 खातेधारक आहेत. या बँकेचे ग्राहक संपूर्ण जगभर आहेत. भारताशिवाय, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, नेपाळ, फिजी आणि युएईमध्ये पण या बँकेचे खातेदार आहेत.

हे सुद्धा वाचा

20,000 कोटी सीताराम बुकलेट्स

रामनगरीतील या बँकेत 20,0000 कोटी सीताराम बुकलेट्स आहेत. भक्तांना ते देण्यात आले आहेत. अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा फायदा या बँकेला पण झाला आहे. या बँकेच्या व्यवस्थापकांच्या मते, प्राण प्रतिष्ठेनंतर या बँकेला भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ही बँक प्रत्येक खात्याची नोंद ठेवते. ही बँक प्रत्येक खातेदाराला मोफत बुकलेट्स आणि एक लाल पेन भेट देते. या बँकेचे खातेदार व्हायचे असेल तर तुम्हाला बुकलेटवर 5 लाख वेळा सीताराम असे लिहावे लागेल. तेव्हा तुमचे खाते उघडल्या जाते. त्यानंतर तुम्हाला पासबूक देण्यात येते. या बँकेच्या जगभर एकूण 136 शाखा आहेत.

कसे मिळते कर्ज

या बँकेत खाते उघडण्यासाठी 5 लाख वेळा सीताराम असे लिहावे लागते. या बँकेतून कर्ज पण मिळते. त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. तीन प्रकारचे कर्ज ही बँक देते. देशातील बँकिंग सिस्टिमप्रमाणे ही बँक काम करते. पहिले कर्ज राम नामाचे असते. दुसरे पठणाचे असते तर तिसरे लिखाणाचे असते. लेखण कर्ज उतरण्यासाठी ग्राहकाला 8 महिने 10 दिवसांचा कालावधी देण्यात येतो. ग्राहकांना सव्वा लाख वेळा राम नाम लिहावे लागते.

पैसे नाही, धर्म, शांती आणि विश्वासाचा व्यवहार

या बँकेत रुपये चालत नाही. तर राम नामाचे महत्व आहे. एका निर्धारीत कालावधीत, निश्चित कालावधीत ग्राहकाला राम नाम लिहून द्यावे लागते. या बँकेत पैशाला काहीच महत्व नाही. तर बँकेला धर्म, शांती आणि विश्वासाचा व्यवहार चालतो. या बँकेतील काही खातेदार असे आहेत की, त्यांनी 1 कोटीहून अधिक बुकलेट बँकेला लिहून दिली आहेत. तर काही भक्तांनी 25 लाखांहून अधिक वेळा सीताराम असे लिहून दिले आहे.

Non Stop LIVE Update
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.