लहान मुलांनाही व्हॅक्सिन मिळणार; मोदींनी सांगितला बालकांच्या लसीकरणाचा प्लान

लहान मुलांनाही व्हॅक्सिन मिळणार; मोदींनी सांगितला बालकांच्या लसीकरणाचा प्लान
narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 18 वर्षांवरील व्यक्तिंना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. (trials ongoing for 2 vaccines for children: PM Modi)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jun 07, 2021 | 6:29 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 18 वर्षांवरील व्यक्तिंना मोफत लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर देशातील लहान बालकांसाठीही दोन लस तयार करण्यात येत असून त्यावर काम सुरू असल्याची महत्वाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. (trials ongoing for 2 vaccines for children: PM Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबतची मोठी घोषणा केली. यावेळी मोदींनी लहान मुलांच्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली. लहान मुलांनाही लस मिळाली पाहिजे. त्यासाठी दोन लसींवर काम सुरू आहे. त्यात लवकरच यश मिळेल, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली. देशात 7 कंपन्या लसनिर्मिती करत आहेत. 3 आणखी लसींची ट्रायल सुरु आहे. लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी अन्य कंपन्यांशी संपर्क सुरू आहे, असंही ते म्हणाले.

नेजल स्प्रेवर काम सुरू

भारताने गेल्या एक वर्षातच दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन तयार केल्या आहेत. आतापर्यंत आपण 23 कोटी लोकांचं लसीकरण केलं आहे. अजूनही लसीकरण सुरू राहणार आहे. नाकातून लस देण्याचा प्रयत्न सुरू असून नेजल स्प्रे व्हॅक्सिनवर काम सुरू आहे. यात यश मिळालं तर देशात वेगाने लसीकरण होईल, असं मोदी म्हणाले.

संशोधकांवर विश्वास होता

आमचे संशोधक लस कमी काळात बनवतील याचा आम्हाला विश्वास होता. या विश्वासामुळेच आम्ही वाहतूक, साठवणूक यासारख्या कामावर लक्ष देऊन सुरू केलं. मागील वर्षीच व्हॅक्सिन टास्क फोर्स बनवली. लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारने हवं ते सहकार्य केलं. आवश्यक निधी पुरवला, सरकार खांद्याला खांदा लावून उभं राहिलं, असं ते म्हणाले.

18 वर्षावरील सर्वांना मोफत लस

येत्या 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील तर त्यांना 25 टक्के लसी उपलब्ध असतील. खासगी रुग्णालयात 150 रुपये भरून लस घेता येईल, असं मोदींनी स्पष्ट केलं. (trials ongoing for 2 vaccines for children: PM Modi)

संबंधित बातम्या:

PM Narendra Modi speech highlights : सर्वांना मोफत लस, दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य!

मोदींची मोठी घोषणा! 18 वर्षावरील सर्वांचं 21 जूनपासून मोफत लसीकरण करणार, केंद्र सरकार सर्व खर्च उचलणार

दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य, मोदी सरकारची मोठी घोषणा

(trials ongoing for 2 vaccines for children: PM Modi)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें