कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे, जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात

कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेसचं सरकार धोक्यात आलं आहे. कारण तब्बल 11 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

Karnataka government in trouble, कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे, जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात

नवी दिल्ली/बंगळुरु :  कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेसचं सरकार धोक्यात आलं आहे. कारण तब्बल 11 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचं सरकार संकटात आलं आहे. ज्या आमदारांनी राजीनाम्याची तयारी केली आहे त्यामध्ये काँग्रेसचे 8 आणि जेडीएसच्या 3 आमदारांचा समावेश आहे.  त्यामुळे कर्नाटकातील ऑपरेशन कमळ पुन्हा खुलण्याची चिन्हं असून, भाजप इथे सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत  भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.  इथे सत्ता स्थापनेसाठी 113 जागांची गरज आहे.

कर्नाटकातील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता आहे. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता आहे. आपल्याला 120 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं कुमारस्वामींनी यापूर्वी म्हटलं होतं.

दीड दिवसांचे मुख्यमंत्री

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे बीएस येडीयुरप्पा अवघ्या दीड दिवसांचे मुख्यमंत्री ठरले होते.  2006 मध्येही कुमारस्वामी यांनी दगाफटका केल्यामुळे येदीयुरप्पा यांचं सरकार कोसळलं होतं. भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वीच या सगळ्याचा बदला घेणार होतं. मात्र ऑपरेशन कमळला त्यावेळी यश आलं नाही. भाजपच्या संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार साथ देतील, ज्यामुळे बहुमताचा आकडा 104 वर येईल. भाजपकडे अगोदरच स्वतःचे 104 आमदार आहेत. शिवाय दोन अपक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो.

संबंधित बातम्या 

भाजप कर्नाटक सरकार पाडण्याच्या तयारीत, सूत्र मुंबईतून हलणार?

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत, दोन अपक्षांनी पाठिंबा काढला  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *