Road Accident: ट्रक आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू तर 17 जखमी

या अपघातामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे तर तब्बल 16 प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे.

Road Accident: ट्रक आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू तर 17 जखमी

गांधीनगर : गुजरातमध्ये बडोद्यात (gujarat vadodara)ट्रक आणि कंटनेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे तर तब्बल 17 प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. बडोद्यातील वाघोडीया क्रॉसिंग (Waghodia Crossing Highway) हायवेजवळ ही घटना घडली आहे. (trucks and container accident in vadodara gujarat 10 killed on spot)

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातातील जखमी सुरत (Surat) इथून पावागडकडे जात होते. यावेळी ट्रक आणि कंटनेरमध्ये टक्कर झाल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. ही धडक ऐवढी भीषण होती की यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जखमींना तातडीने वडोदरा इथल्या एसएसजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अद्याप अपघाताचं मुख्य कारण कळू शकले नाही.

अपघातामधील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे . एका लग्नसमारंभातून ते परत येत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 10 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलीस सध्या घटनास्थळी अपघाती वाहन बाजूला करून प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांनी अपघाताची माहिती देण्यात येत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या काही दिवसांत गुजरातमधील वडोदरा इथं झालेल्या दुसर्‍या रोड अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातही मृतांची संख्या जास्त आहे.

इतर बातम्या – 

तारळी नदीच्या पुलावर भीषण अपघात, मिनीबस 50 फूट खाली कोसळल्याने 5 जण जागीच ठार

काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, 3 मजूरांचा जागीच मृत्यू

(trucks and container accident in vadodara gujarat 10 killed on spot)

Published On - 10:27 am, Wed, 18 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI