ज्याची भीती होती तेच झालं, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आता थेट देश सोडण्याचे आदेश, जगभरात खळबळ, भारताचं काय होणार?
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत, काही दिवसांपूर्वीच त्यांनी एच-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला होता, त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत, काही दिवसांपूर्वीच त्यांनी एच-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला, त्यांनी शुल्कामध्ये मोठी वाढ केली. आता H-1B व्हिसासाठी तब्बल एक लाख डॉलर म्हणजे भारतीय चलनामध्ये 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. एच- 1 बी व्हिसाच्या शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे अमेरिकेत नोकरीसाठी येणाऱ्या इतर देशातील कर्मचाऱ्यांना चाप बसेल आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असं या पाठीमागे अमेरिकेचं धोरण असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार आता ट्रम्प प्रशासन दुसऱ्या देशातून अमेरिकेमध्ये आलेल्या आणि एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलांना अमेरिका सोडण्यासाठी प्रोहत्साहित करत आहे, या मुलांना अमेरिका सोडण्यासाठी 2,500 डॉलर म्हणजे भारतीय चलनामध्ये 2 लाख 21 हजार रुपये मिळणार आहेत, हा ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय मानला जात आहे, अमेरिकेत इतर देशातून आलेल्या स्थलांतरीताचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सध्या सुरू आहे.
कोणाला मिळणार रक्कम?
शुक्रवारी अमेरिकन सरकारकडून याबाबत एक अधिकृत पत्रक काढण्यात आलं आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की, 14 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाची जी मुलं आहेत, त्यांना जर त्यांच्या मर्जीनं अमेरिका सोडून आपल्या देशात जायचं असेल तर ते जाऊ शकतात. त्यासाठी त्यांना सेटलमेंट सपोर्ट स्टायपेमेंड देण्यात येईल, अशा मुलांना 2,500 डॉलर देण्यात येतील, एवढंच नाही तर ज्या कामगारांना अमेरिका सोडायची आहे अशा कामगारांना देखील अमेरिकन सरकारकडून एक हजार डॉलर देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून 250 मिलियन डॉलरचा खास फंड तयार करण्यात आला आहे. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयावर जगभरातून टीका सुरू झाली आहे.
दरम्यान दुसरीकडे ट्रम्प यांच्याकडून सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी टॅरिफ लावला, त्यानंतर आता एच -1बी व्हिसाचं शुल्क देखील वाढवण्यात आलं आहे, त्यामुळे अनेक भारतीय लोकांचं अमेरिकेत जॉबला जाण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.
