नवऱ्यांनी फक्त वापरलं, अखेर दोन मैत्रिणी अडकल्या विवाहबंधनात; पुढचं प्लानिंगही सांगितलं
बदायूंमधील दोन महिलांना त्यांच्या नवऱ्यांकडून अत्याचार सहन करावे लागले. या अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी एकमेकींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिव मंदिरात त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. या जोडप्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आपला निर्णय कळवला असून, त्यांच्या पाठिंब्याशिवाय दिल्लीत मोलमजुरी करून जीवन जगण्याचा निश्चय केला आहे.

उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये दोन मैत्रिणींना त्यांच्या नवऱ्यांकडून धोका मिळाला. नवऱ्यांनी फक्त वारपलं. छळलं. त्यामुळे काळजाला भेग्या पडल्या. दोघींच्या बाबतीत सेम झालं. त्यामुळे दोघींनीच एकमेंकींना आधार द्यायचं ठरवलं. दोघी शिव मंदिरात गेल्या. एकमेकींना वरमाला घातल्या अन् लग्न केलं. सातफेरे घेऊन एकत्र जगण्याच्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या. नवराबायको सारखंच राहू असं दोघींनी एकमेकींना आश्वासन दिलं.
यातील एक तरुणी अलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिची मैत्रीण लाइन्स कोतवाली परिसरातील आहे. तीन महिन्यापूर्वी पोलीस ठाणे परिसरात एका वकिलाच्या चेंबरमध्ये दोघींची भेट झाली. भेटीनंतर दोघींमध्ये गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर दोघांमध्ये घनिष्ट मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि या नात्याचं रुपांतर लग्नात झालं. दोन्ही तरुणी विवाहित होत्या. पण दोघींनाही त्यांच्या नवऱ्यांनी धोका दिला. त्यामुळे त्यांच्यावर आभाळ कोसळलं होतं. मनाने खच्चून गेल्या होत्या.
वापरलं आणि सोडलं
लग्नानंतर दोघींनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. पुरुषांनी फक्त वापर केला आणि सोडून दिलं. त्यामुळे आमच्या काळजाला मोठा घाव झाला. म्हणूनच आम्ही दोघींनी एकमेकींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सोनू (काल्पनिक नाव) नवरा बनली. तर रीता (काल्पनिक नाव) बायको बनली. दोघींनीही हायस्कूलपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. सोनू पश्चिम दिल्लीच्या बेबी केअरमध्ये काम करत होती. तर रीता डेहराडूनच्या एका सेक्युरीटी फर्ममध्ये नोकरी करत होती.
ऐकलं तर ठिक…
सध्या दोघी बदायूँमध्ये आहेत. लग्नानंतर भविष्यातील जबाबदाऱ्या स्वीकारून एकत्र राहण्याच्या तयारीत आहेत. कुटुंबीयांना आम्ही आमचा निर्णय कळवला आहे, असं दोघींनी सांगितलं. कुटुंबाने साथ दिली तर ठिक नाही तर दिल्लीतच मोलमजुरी करून आम्ही आयुष्य घालवू, असं त्या म्हणाल्या.
शिव मंदिरात लग्न
ही अनोखी लग्नाची बातमी पोलीस ठाणे परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. काही लोक याला दोन तुटलेल्या हृदयांचा धैर्यपूर्ण निर्णय मानत आहेत, तर काहीजण याचे सामाजिक आणि कायदेशीर पैलूंचाही विचार करत आहेत. अॅडव्होकेट दिवाकर वर्मा यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या दोन तरुणी माझ्या चेंबरमध्ये आल्या आणि स्वतःच्या इच्छेने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर कायदेशीर संमतीसाठी एक करार तयार करण्यात आला, ज्यावर दोघींनी सही केली. त्यानंतर शिव मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह विधी पार पाडण्यात आले, असं दिवाकर वर्मा म्हणाले.
पुरुषांकडून फसवणूक
पोलीस ठाणे परिसरात दोन युवतींनी सर्व सामाजिक बंधने तोडून एकमेकींशी विवाह केला. मंदिरात एकमेकींना वरमाला घालून सात फेरे घेत त्यांनी एकत्र जीवन जगण्याच्या आणि मरण्याच्या शपथा घेतल्या. त्यांचे म्हणणे आहे की, पुरुषांनी नेहमी त्यांना फसवले, केवळ अत्याचार आणि जखमाच दिल्या. आता त्या एकमेकींचा आधार बनून आयुष्य व्यतीत करू इच्छितात.
