केंद्राच्या विभागांना कारभारी मिळेनात! सचिव स्तरावरील 12 पदं रिक्त, 2 वर्षापांसून PMO सचिवाविना

केंद्र सरकारकडे विविध कार्यालयात सचिवांची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारच्या अनेक सचिवालयात विविध पदं रिक्त असून रिक्त पदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या विभागांना कारभारी मिळेनात! सचिव स्तरावरील 12 पदं रिक्त, 2 वर्षापांसून PMO सचिवाविना
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली: केंद्र सरकारकडे विविध कार्यालयात सचिवांची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारच्या अनेक सचिवालयात विविध पदं रिक्त असून रिक्त पदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश कार्यालयात सचिवांविना काम सुरु असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान कार्यालयात सचिव स्तरावरील पदं रिक्त असल्याचं समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान कार्यालयालाही जुलै 2019 पासून सचिव नाही. भास्कर कुल्बे हे सल्लागार म्हणून परत आले असले तरी पंतप्रधान कार्यालयाला सचिव मिळालेला नाही.

केंद्र सरकारमध्ये सचिवस्तरावरील 12 पदे रिक्त

उच्च न्यायालये आणि विविध न्यायाधिकरणासोबतच केंद्र सरकारमध्येही सचिवस्तरावरील अनेक पदे रिक्त असल्याचं पुढं आलं आहे. अनेक महिन्यांपासून सचिव स्तरावरील 12 पदे रिक्त असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान कार्यालयालाही सचिव नाही

विशेष बाब म्हणजे पंतप्रधान कार्यालयालाही जुलै 2019 पासून सचिव नाही. भास्कर कुल्बे हे सल्लागार म्हणून परत आले असले तरी पंतप्रधान कार्यालयाला सचिव मिळालेला नाही. प्रधान सल्लगार पी. के. सिन्हा आणि विशेष सल्लागार अमरजित सिन्हा यांनी राजीनामा दिल्यापासून पंतप्रधान कार्यालयात नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत.

रिक्त पदांची संख्या वाढणार

सध्या सचिवस्तरावरील 12 पदं रिक्त असली तरी येत्या काळात रिक्त पदांची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती आहे. आणखी काही विभागाचे सचिव निवृत्त होणार असल्याने महिनाअखेरपर्यंत रिक्त पदांची संख्या वाढू शकते असं कळतंय.

कोणत्या विभागाला सचिव नाहीत?

केंद्र सरकारच्या सर्व नियुक्त्यांसंबंधी कामकाज पाहणाऱ्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागालाही सचिव नाहीत. पेन्शन विभागालाही सचिव नाहीत. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त पदभार आहे. नव्यानेच स्थापन करण्यात आलेले सहकार मंत्रालयही आपल्या पहिल्या सचिवांच्या प्रतीक्षेत असून, कृषी सचिव संजय अगरवाल हे अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत.

पेयजल स्वच्छता विभागाचा कारभार सचिवाविना

उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाचा कारभारही मार्ग वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरीधर अरमाने हे तात्पुरती व्यवस्था म्हणून पाहात आहेत. जलसंसाधन मंत्रालयाच्या अखत्यारितील पेयजल आणि स्वच्छता विभागाचा कारभारही जानेवारी 2021 मध्ये परमेश्वरन अय्यर यांनी राजीनामा दिल्यापासून सचिवांविना चालत आहे.

नव्यानं स्थापन झालेलं सहकार मंत्रालयही सचिवांविना

केंद्र सरकारनं नुकतीच केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची देशभरात चर्चा झाली होती.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकार मंत्रालयाची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, त्यांच्यांही सहकार मंत्रालयाला सचिव नसल्याचं समोरं आलं आहे.

कारभाराला गती कशी मिळणार?

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या महत्वाच्या खात्यांना सचिवस्तरावरील अधिकारी नसल्यानं कारभाराला गती कशी मिळणार हा प्रश्न आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी सचिव निवृत्त होत असल्यानं सध्या कार्यरत असणाऱ्या सचिवस्तरावरील अधिकाऱ्यांवरील ताण वाढणार आहे. सध्याच्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे दुसऱ्या विभागांचा अतिरिक्त कारभार असल्यानं ते दोन दोन विभागांचा कारभार कसा हाताळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

इतर बातम्या:

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांचा ईडी तपास सुरु, ECIR दाखल

ईडीचा पुन्हा दणका; अनिल देशमुखांशी संबंधित तीन ठिकाणांवर धाडी!

Union Government twelve Secretary posts are vacant pmo also not have Secretary from last two years

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI