AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाचा शताब्दी महोत्सव राष्ट्रधर्माची अखंड गाथा आहे, स्वामी अवधेशानन्द गिरी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळ्या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम चालणार आहेत. संघाने आतापर्यंत आलेल्या अनेक नैसर्गिक संकटात आपल्या स्वयंसेवकांची फौज उभी केली आहे. या संघाच्या शताब्दी सोहळ्या निमित्त विशेष नाणे देखील प्रकाशित करण्यात येणार आहे.

संघाचा शताब्दी महोत्सव राष्ट्रधर्माची अखंड गाथा आहे, स्वामी अवधेशानन्द गिरी यांचे प्रतिपादन
| Updated on: Oct 01, 2025 | 11:09 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण देशात उत्सव आणि गौरवाचे वातावरण आहे. शताब्दी वर्षे केवळ एक संघटनेच्या मैलाचा दगड नाही, तर भारतभूमीच्या आत्मा आणि सनातन संस्कृतीच्या जीवंत धारेचे प्रतिक आहे. या प्रसंगी सनातन धर्माच्या परंपरेचे वाहक श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रोत्रिय ब्राह्मणिष्ठ जुनापिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर अनंतश्री विभूषित पूज्यपाद श्री स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांनी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.

त्यांनी पाठवलेल्या संदेशात त्यांनी संघाच्या शताब्दीला केवळ संघटनेचा प्रवास मानले नाही तर तिचे राष्ट्रवादाची अखंड गाथा म्हणून वर्णन केले आणि संघाचे मार्गदर्शन भारत आणि जागतिक मानवतेसाठी मार्गदर्शक तत्व प्रतिपादीत केले आहे.

पूज्य स्वामीजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त आपल्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की, ‘भारतभूमीचा इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि घटनांचा क्रम नाही ,तर सनातन संस्कृतीच्या अमर स्पंदनाचा प्रवाह आहे. या प्रवाहाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उदय दिव्य धारेचे प्रतीक आहे. ज्याने गेल्या १०० वर्षांत भारताच्या आत्म्याला जागृत केले, समाजाला संस्कारित केले आणि राष्ट्राच्या चेतनेला एकात्मतेच्या दिशेने पुढे नेले आहे.’

हे शताब्दी वर्षे केवळ कोणा संघटनेचा प्रवास नसून राष्ट्रधर्माची अखंड गाथा आहे. हा प्रवास दिव्य संस्कारांच्या हा एक अखंड, अद्वितीय आणि उदात्त अलौकिक सांस्कृतिक आध्यात्मिक अखंड प्रवाह आहे, ज्याने वैयक्तिक विकासाला राष्ट्र उभारणीचा मूलभूत मंत्र बनवले आहे. संघटनेची अजेय शक्ती, जीने विविधता आणि विभिन्नतांना एकात्मते परिवर्तित करुन सशक्त समर्थ भारताच्या स्वप्नांना साकार केले आहे. कल्याणकारी सेवांचा संकल्प, ज्याने संकटं, अपघात आणि महासाथीच्या प्रत्येक घडीत करुणा आणि सर्वतोभावेन समर्पणाने समाजाला आपले सर्वस्व अर्पण केले आहे.

संघाच्या स्थापनेच्या वेळी भारत गोंधळलेला होता आणि गुलामगिरीच्या अंधारात बुडालेला होता.अशा वेळी परम पूज्य डॉ.हेडगेवार यांनी हे दाखवले की जर प्रत्येक हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली तर स्वराज्याचा सूर्य उदय होणे निश्चित आहे. तीच ज्योत आजही शाखांमध्ये स्वयंसेवकांच्या जीवनात आणि राष्ट्रचेतनेत प्रकाशित आहे.

आज जेव्हा मानवतेची भौतिकतेची अंध शर्यत दिशाहीन होत असेल तेव्हा संघाचे “एकात्म मानव दर्शन” संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी पथप्रदर्शक आहे. हे दर्शन आपल्या स्मरण करते की धर्म केवळ पूजा -पद्धतीपर्यंत मर्यादित नाही, उलट समाज-कल्याण, चरित्र – निर्माण आणि राष्ट्र सेवेचा महान यज्ञ आहे.

वेदाचा हा अमर मंत्र

“संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्” हा संघाच्या प्रत्यक्ष साधनेचा स्वर आहे.हा शताब्दी पर्वात आपण पुन:स्मरण करुयात की आता आपण सर्वत्र एकत्र चाललो, एकत्र विचार केला, आणि एक साथ संकल्प केला तर भारत भूमिचे स्वर्णिम भविष्य निश्चित रुपाने साकार होईल.

हा शताब्दी सोहळा आपल्या सर्वांसाठी केवळ एकमात्र उत्सव नाही, तर दैवीय आव्हान आहे की आपण सर्व सनातन संस्कृतीचे संवाहक बना. “वसुधैव कुटुम्बकम्” च्या भावनेला जगासमोर सक्षम जीवितप्रमाण बनवून सादर करावे, आपल्या आचारणातून हे सिद्ध करावे की “सेवा ही परमो धर्मः” आहे.

सनातन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यात,राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात आणि सेवा, दान आणि परोपकारी प्रवृत्तींचा प्रसार करण्यात अहोरात्र गुंतलेल्या संघशक्तीच्या दिव्य प्रकाशाने उजळलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या अनंत शुभेच्छा.

Follow Us
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा.
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.