उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचं आणि राजस्थानच्या भाजप आमदाराचं कोरोनाने निधन

उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील राज्यमंत्री विजय कश्यप यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर मेंदाता रुग्णालयात उपचार सुरू होते. (UP Minister Vijay Kashyap and Rajasthan MLA Gautam Lal Meena succumbs to Covid)

उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचं आणि राजस्थानच्या भाजप आमदाराचं कोरोनाने निधन
Gautam Lal Meena
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 11:20 AM

लखनऊ: उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील राज्यमंत्री विजय कश्यप यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर मेंदाता रुग्णालयात उपचार सुरू होते. तर राजस्थानचे भाजपचे आमदार गौतम लाल मीणा यांचंही कोरोनाने निधन झालं आहे. (UP Minister Vijay Kashyap and Rajasthan MLA Gautam Lal Meena succumbs to Covid)

विजय कश्यप हे योगी सरकारमध्ये पूर व्यवस्थापन राज्यमंत्री होते. त्यांना 29 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच काल उशिरा त्यांचे निधन झाले. ते मुजफ्फर नगरमधील चरथावल विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कश्यप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे ते नेते होते. ते नेहमी जनहिताची कामे करायचे, असं मोदी यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कश्यप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कश्यप हे लोकप्रिय नेते होते. त्यांनी मंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलं आहे. ते जनतेचे सच्चे सेवक होते, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कश्यप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

गौतम लाल मीणा यांचं निधन

राजस्थानचे भाजपचे आमदार गौतम लाल मीणा यांचं आज सकाळी कोरोनाने निधन झालं. त्यांच्यावर महाराणा भोपाळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ते उदयपूर धरियावद येथील आमदार होते. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. मीणा यांच्या निधनावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शोक व्यक्त केला आहे.

महिन्याभरात पाच भाजप आमदारांचं निधन

उत्तर प्रदेशात महिन्याभरात पाच भाजप आमदारांचं कोरोनानं निधन झालं आहे. सुरेश श्रीवास्तव, रमेश चंद्र दिवाकर, केसर सिंह गंगवार, बहादूर कोरी आणि विजय कश्यप या पाच आमदारांचं कोरोनाने निधन झालं आहे. तसेच मुजफ्फर नगरमधील भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांचे बंधू जितेंद्र बालियान यांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. (UP Minister Vijay Kashyap and Rajasthan MLA Gautam Lal Meena succumbs to Covid)

संबंधित बातम्या:

COVID-19 : कोविड काळात रोज गरम पाणी का प्यावं?; वाचा फायदेच फायदे!

Corona Vaccine : भारतात तुटवडा, मात्र ‘या’ देशांकडे लोकसंख्येच्या 5 पट कोरोना लसींचा साठा

Covid 19: रुग्णाला एकाचवेळी कोरोना आणि म्युकरमायकोसिसची लागण होऊ शकते का?

(UP Minister Vijay Kashyap and Rajasthan MLA Gautam Lal Meena succumbs to Covid)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.