DRDO IADWS : टॅरिफवरुन चीन-भारतामध्ये भेदभाव करणाऱ्या ट्रम्प यांना भारताच आणखी एक कडक उत्तर IADWS
DRDO IADWS : भारतासाठी आज मोठा दिवस आहे. चीन-पाकिस्तानसाठी ही चांगली बातमी नाहीच आहे. पण भारताला कमी लेखणारे, दादागिरी करणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सुद्धा हे एक कडक उत्तर आहे. ते म्हणजे IADWS.

भारताने हवाई सुरक्षा क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO ने ओदिशाच्या किनाऱ्यावर इंटीग्रेटेड एअर डिफेंस वेपन सिस्टमची (IADWS) पहिली यशस्वी चाचणी केली आहे. ही पूर्णपणे स्दवेशी एअर डिफेन्स सिस्टिम आहे. IADWS च वैशिष्ट्य म्हणजे अनेक लेयर्स विविध स्तरीय सुरक्षा या सिस्टिमची खासियत आहे. भारताने स्वबळावर IADWS विकसित करणं ही चीन-पाकिस्तानसाठी मोठी धोक्याची घंटा आहेच. पण टॅरिफवरुन भारताला नडणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सुद्धा मोठी चपराक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टॅरिफ आकारलाय, त्यासाठी त्यांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदीला कारण बनवलय. भारत रशियाकडून तेल विकत घेतो, त्यामुळे युक्रेन युद्ध अजून सुरु आहे असा अजब तर्क मांडत भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावलाय.
डोनाल्ड ट्रम्प हे वरवर टॅरिफ लावण्यासाठी रशिया-युक्रेन युद्धाच कारण देत असले तरी त्यांनी टॅरिफ लावण्यामागे तीन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानमध्ये यशस्वी मध्यस्थी केल्याचा ते दावा करतात. पण भारत त्यांना ते श्रेय देत नाहीय. त्यामुळे त्यांची नाचक्की होतेय. दुसऱ्याबाजूला भारताने त्यांचं डेअरी मार्केट ओपन करुन द्यावं अशी त्यांची इच्छा आहे. पण भारतातल्या लाखो शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असल्याने मोदी सरकार त्यासाठी तयार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे भारताने अमेरिकेकडून F-35 फायटर जेट्स आणि प्रीडिएटर ड्रोन सारखी महागडी शस्त्र घ्यावीत अशी त्यांची इच्छा आहे.
IADWS त्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल
आज भारताने IADWS ची यशस्वी चाचणी करुन त्यांच्या तिसऱ्या प्रश्नाच उत्तर दिलय. IADWS ही रशियन S-400 सारखी भारताची स्वत:ची एअर डिफेन्स सिस्टिम आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषाणात भारतात सर्वत्र महत्वाच्या ठिकाणांना एअर डिफेन्स प्रणालीच सुरक्षा कवच दिलं जाईल असं जाहीर केलं होतं. त्यानुसार IADWS त्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. भारताकडे जर शत्रुची फायटर जेट्स पाडण्याची स्वत:ची अस्त्र असतील, तर महागडी F-35, प्रीडिएटर ड्रोन्स घेऊन उपयोग काय?
एक कडक उत्तर
भारतावर वर्चस्व गाजवण्याची, जी अमेरिकन मानसिकता आहे, त्याचं डोनाल्ड ट्रम्प प्रतिनिधीत्व करतात. पण आजचा भारत हा 20 ते 30 वर्षापूर्वीचा भारत राहिलेला नाही. हे ट्रम्प यांनी समजून घेतलं पाहिजे. स्वत:च्या गरजेनुसार, सुरक्षेसाठी आवश्यक ती टेक्नोलॉजी आणि शस्त्र निर्माण करण्याची धमक आजच्या भारतामध्ये आहे. DRDO ने विकसित केलेली IADWS प्रणाली हे त्याचचं प्रतीक आहे. IADWS मध्ये शत्रुची मिसाईल्स, ड्रोन्स आणि फायटर जेट्स पाडण्याच तंत्रज्ञान आहे. हे भारताने स्वबळावर विकसित केलय. त्यामुळे टॅरिफवरुन दादागिरी करणाऱ्या ट्रम्प यांच्यासाठी एक कडक उत्तर आहे.
