AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर आहे की जंगल? 4 भिंतीत 30 सापांच्या पिल्लांचा सुळसुळाट; कुटुंबीय दहशतीत

snake found in house : उत्तर प्रदेशच्या एका घरात सापांची तीस पिल्ले आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

घर आहे की जंगल? 4 भिंतीत 30 सापांच्या पिल्लांचा सुळसुळाट; कुटुंबीय दहशतीत
| Updated on: Jul 30, 2026 | 3:03 PM
Share

तुम्ही जंगलात, डोंगराळ भागात गेल्यावर तुम्हाला नाग, सापाचं दर्शन होण्याची शक्यता अधिक असते. अनेक जण सापाच्या भितीने जंगलात फेरफटाका मारायलाही घाबरतात. डोंगराळ भागात अनेक जण जमिनीवर पाहून चालत असतात. मानवी वस्तीत साप क्वचितपणे दिसून येतो. खरंतर जीवघेण्या विषारी सापांची सर्वसामान्यांना खूपच भीती वाटत असते. साधा रस्त्यावर एक साप दिसला तरी नागरिकांची एकच धावाधाव होते. परंतु एका घरात चक्क 30 साप आढळून आल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बर्डपूर ब्लॉक भागातील करीमपूर महापाली गावात मंगळवारी रात्री अजय गुप्ता यांच्या घरात एका पाठोपाठ एक साप आढळू लागल्याने घरात एकच खळबळ उडाली आहे. या घरात एक नव्हे तर 30 साप आढळून आले. त्यानंतर घरातील सर्वांची एकच धावाधाव झाली. साप आढळून आल्यानंतर कुटुंबातील एका सदस्याने सकाळी सर्पमित्राला बोलावून आणले. त्यानंतर सर्पमित्राने घरातील कानाकोपऱ्यात लपून बसलेल्या सापांच्या तीस पिल्लांना पकडलं. घरातील कोपऱ्यात असलेली अंडी फुटून सापांची पिल्ले बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्पमित्राने एका प्लास्टिकच्या डब्यात सर्व सापांना बंदिस्त केलं. त्यानंतर जंगलात नेऊन सोडून दिलं.

त्यादिवशी काय घडलं?

घरातील एक सदस्य झाडू मारत होता. त्यावेळी सापाचं पिल्लू घरात आढळलं. त्यानंतर झाडूच्या आधारे सापाचं पिल्लू बाहेर फेकलं. त्यानंतर घरात एका पाठोपाठ सापांची पिल्ले आढळून येऊ लागली. त्यामुळे घर मालक अजय गुप्ताने कुटुंबतील सदस्यांना घरात जाऊ दिले नाही. घरात दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या संख्येने लोक जमले. त्यावेळी एका सर्पमित्राला बोलावण्यात आलं. त्यानंतर सर्पमित्राने घरात बारकाईने सापांची 30 पिल्ले शोधून काढली. त्यानंतर या सर्पमित्राने सर्व सापांच्या पिल्लांना सुरक्षितरित्या प्लास्टिक डब्यातून जंगलात सोडून दिले. सापांची पिल्ले घरात नेमकी कशी पोहोचली, याची माहिती हाती आलेली नाही. परंतु थेट घरात सापांची पिल्ले आढळू लागल्याने गावकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा