AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आहेत सभावती शुक्ला, गोरखपूर लढत या कारणासाठी असणार लक्षवेधी, चर्चेतील चेहऱ्यांचा मतदार संघ

मुंबईः उत्तर प्रदेशमधील निवडणूकांसाठी आता फक्त तीन दिवस राहिले आहे. त्यामुळे सगळ्या राजकिय पक्षांकडे विरोधकांवर जोरदार टीका केली जात आहे. पहिला सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून (Samajwadi Party) 24 उमेदवारांची यादी (Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. समाजवादीकडून सभावती शुक्ला (Sabhawati Shukla) यांना गोरखपूर शहर मधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मैदानात उतरल्या आहेत. योगी […]

योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आहेत सभावती शुक्ला, गोरखपूर लढत या कारणासाठी असणार लक्षवेधी, चर्चेतील चेहऱ्यांचा मतदार संघ
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 8:52 PM
Share

मुंबईः उत्तर प्रदेशमधील निवडणूकांसाठी आता फक्त तीन दिवस राहिले आहे. त्यामुळे सगळ्या राजकिय पक्षांकडे विरोधकांवर जोरदार टीका केली जात आहे. पहिला सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून (Samajwadi Party) 24 उमेदवारांची यादी (Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. समाजवादीकडून सभावती शुक्ला (Sabhawati Shukla) यांना गोरखपूर शहर मधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मैदानात उतरल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील माजी नेत्याच्या पत्नीला उमेदवारी जाहीर झाल्याने या जागेसाठी जोरदार लढत होणार आहे.

समाजवादी पक्षाकडून फाफामऊमधून अन्सार अहमद आणि मनकापूरमधून रमेश चंद्र गैतम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. समाजवादीकडून पडरौना जागेवर विक्रमा यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तीन दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे समाजवादीकडून विचारपूर्वक आणि रणनिती आखून उमेदवारांना उतरवत आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख असलेले आणि आझमगडचे जिल्हाध्यक्ष अखिलेश यादव येत्या निवडणूकीत मुबारकपूरमधून निवडणूक लढवित आहेत.

गोरखपूर लक्षवेधी ठरणार

मुख्यमंत्री योगी यांना टक्कर देण्यासाठी भाजपचे नेते म्हणून ओळखले जाणारे उपेंद्र शुक्ल यांची पत्नी सभावती यांना उतरवण्यात आले आहे. गोरखपूर मतदार संघातून योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे समाजवादीकडून दिवंगत उपेंद्र शुक्ल यांच्या पत्नीला निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी भाजपचे उपेंद्र शुक्ल आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह समाजवादी पक्षात सामील झाले होते. आता अखिलेश यादव यांनी त्यांच्या पत्नीला योगींच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे.

सभावती यांना जोरदार ठक्कर

गोरखपूर शहरमधून 60 ते 70 टक्के लोक ब्राह्मण मतदार आहेत. तर ठाकूर मतदारांची संख्या 25 ते 30 टक्के आहे. आझाद समाज पक्षाने या मतदार संघातून चंद्रशेखर उर्फ रावण यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे योगी हे सभावती यांना जोरदार ठक्कर देण्याची शक्यता आहे. तर दुसरी चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हेही निवडणूकीच्या रिंगणात असल्याने जोरदार चर्चेची होणार आहे. चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलन आणि सामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी उठवलेला आवाज या निवडणूकीत त्यांना कसा फायदेशीर होणार की तोटा सहन करावा लागणार हे आता येणारे निकालाच सांगणार आहेत.

संबंधित बातम्या

मोदींचं मजुरांबाबतचं वक्तव्य म्हणजे हृदयशून्यतेचे उदाहरण, काँग्रेस नेते म्हणतात मोदी…

VIDEO: महाराष्ट्राची राजकीय संस्कृती का ग्रेट आहे? शरद पवार-गोयलांचा हा व्हिडीओ पाहिलात?

TV9 Final Opinion Poll: : उत्तर प्रदेशात कोणत्या टप्प्यात कोण बाजी मारणार? सात टप्प्यातील नेमकं चित्रं काय?; वाचा ‘टीव्ही9 ओपिनियन फायनल पोल’

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.