वंदेभारत मेट्रो या वर्षांत दाखल होणार, 300 किमीच्या अंतरासाठी भारतीय रेल्वेचा वेगवान पर्याय

देशभारत एक्सप्रेसला मिळालेल्या यशानंतर आता वंदेभारत मेट्रो ट्रेन मार्च महिन्यापर्यंत दाखल होणार आहेत. या ट्रेन 250 ते 300 किमीच्या छोट्या अंतरासाठी चालविण्याची योजना आहे. काय आहेत नेमकी वंदेभारत मेट्रोची वैशिष्ट्ये पाहा

वंदेभारत मेट्रो या वर्षांत दाखल होणार, 300 किमीच्या अंतरासाठी भारतीय रेल्वेचा वेगवान पर्याय
vande metroImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 2:40 PM

नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : आलिशान आणि वेगवान अशा भारताच्या पहिल्या सेमी हायस्पीड वंदेभारत ट्रेनला मिळालेल्या यशानंतर आता वंदेभारत मेट्रो दाखल होणार आहे. वंदेभारत मेट्रो ट्रेन ही 250 ते 300 किमीच्या छोट्या अंतरासाठी तयार करण्यात येत आहे. या वंदेभारत मेट्रो ट्रेन लवकरच ट्रॅकवर दाखल होणार आहेत. या ट्रेन संपूर्ण वातानुकूलित असतील. तसेच त्यांच्या आत गॅंगवे असणार असून प्रवाशांना गाडीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एका डब्यातून शेवटच्या डब्यापर्यंत जाता येणार आहे.

वंदेभारत ही देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनचा प्रवास दर ताशी 160 किमी वेगाने करता येतो. वंदेभारत ट्रेनला स्वतंत्र इंजिन जोडण्याची आवश्यकता नसते. तसेच ही ट्रेन संपूर्ण वातानुकूलित असून स्वयंचलित दरवाजे असणारी आहे. सध्या देशात एकूण 34 वंदेभारत ट्रेन सुरु आहेत. या ट्रेनचा प्रवास आरामदायी आणि वेगवान असल्याने अनेक राज्यांनी वंदेभारत चालविण्याची मागणी केली आहे. यावर्षी 60 वंदेभारत सुरु होण्याची शक्यता आहे.

मार्चपर्यंत दाखल होणार

पहिली वंदेभारत ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 मध्ये दिल्ली ते वाराणसी मार्गावर चालविण्यात आली होती. देशात सध्या एकूण 34 वंदेभारत ट्रेन सुरु आहेत. वंदेभारत चेअरकारची ट्रेन आहे. त्यामुळे तिची स्लीपर कोच आवृत्ती लवकरच येणार आहे. ही स्लीपर कोच वंदेभारत राजधानीच्या मार्गावर दिल्ली ते मुंबई चालविण्याची शक्यता आहे. वंदेभारतला मिळालेल्या यशानंतर मेन लाईनवर ईएमयूच्या जागी वंदेभारतची वंदेभारत मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. वंदेभारत मेट्रो मार्च महिन्यापर्यंत रुळावर येईल असे म्हटले जात आहे. वंदेभारत मेट्रो वातानुकूलीत ट्रेन आहे. त्यात प्रत्येक डब्यात शंभर प्रवाशांना बसण्याची सोय असणार आहे. तर 200 प्रवाशी उभ्याने प्रवास करु शकणार आहेत.

सिलबंद गॅंगवे –

या ट्रेनला मध्यभागी गॅंगवे असणार असून डब्यांदरम्यानचा गॅंगवे सिलबंद असणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सिलबंद गॅंगवे असणार आहे.

लाईटवेट डिझाईन –

या ट्रेनला लाईटवेट कारबॉडी असणार आहे. अत्याधुनिक डिझाईन, आरामदायी कुशनवाली आसने असणार आहेत.

ऑटोमेटीक डोअर –

प्रत्येक डब्याला चार स्वयंचलित डोअर असणार आहेत.

एअरोडायनामिक डिझाईन –

यव्हर केबिन एअरोडायनामिक डिझाईनची असणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान –

देभारत मेट्रोत सीसीटीव्ही कॅमेरे, एलसीडी डिस्प्लेसह पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, चांगला प्रकाश आणि रुट इंडीकेटरची सुविधा असणार आहे.

सेफ्टी फिचर्स –

त प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑटोमेकीट फायर डिटेक्शन आणि अलार्म यंत्रणा असणार आहे.

खिडक्या –

या ट्रेनला रुंद पॅनोरॅमिक डिझाईनच्या खिडक्या असणार असून त्यास रोलर ब्लाईंड असणार आहेत.

आपात्कालिन संपर्क –

आपात्कालिन संपर्कासाठी प्रत्येक डब्यात टॉक बॅक यंत्रणा असणार आहे.

टॉयलेट फॅसिलिटी –

विमानतळाप्रमाणे व्हॉक्युम इव्हाक्युशेन सिस्टीमचे मॉड्युलर टॉयलेट असणार आहेत.

लगेज स्पेस –

प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी एल्युमिनियमचे लगेज रॅक असतील.

टक्कर विरोधी यंत्रणा –

ट्रेन ट्रेनची टक्कर टाळणारी ‘कवच’ नावाची टक्कर विरोधी यंत्रणा यात असणार आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.