AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jagdeep Dhankar Resignation : भाजप खासदारांकडून कोऱ्या कागदावर घेतली सही, धनखड यांच्या राजीनाम्यापूर्वी काय घडलं?

Jagdeep Dhankar Resignation : सोमवारी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. राजकीय नेते विविध अंदाज वर्तवत आहेत. जगदीप धनखड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी पडद्यामागे काय घडामोडी घडल्या? त्या बद्दल जाणून घेऊया.

Jagdeep Dhankar Resignation :  भाजप खासदारांकडून कोऱ्या कागदावर घेतली सही, धनखड यांच्या राजीनाम्यापूर्वी काय घडलं?
Jagdeep Dhankhar
| Updated on: Jul 22, 2025 | 9:44 AM
Share

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीचं कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या अचानक राजीनाम्यानंतर विरोधी पक्षांकडून विविध अंदाज वर्तवले जात आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांचे राज्यसभेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासोबत अनेकदा वादविवाद झालेत. रमेश यांनी सांगितलं की, संध्याकाळी 7.30 वाजता धनखड यांच्यासोबत टेलिफोनवर माझी चर्चा झाली. धनखड त्यावेळी आपल्या कुटुंबासोबत होते. त्याआधी संध्याकाळी जवळपास 5 वाजता जयराम रमेश, प्रमोद तिवारी आणि अखिलेश प्रसाद सिंह धनखड यांना भेटले. जयराम म्हणाले की, “सर्वकाही सामान्य वाटत होतं. धनखड म्हणाले की, बिझनेस एडवायजरी कमिटीची बैठक मंगळवारी सकाळी 10 वाजता होईल”

धनखड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी वरिष्ठ भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात वेगाने घडामोडी घडत होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, एका भाजप खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, त्यांच्याकडून एका सफेद कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

त्यांची प्रकृती चांगली होती

काँग्रेस खासदार अखिलेख प्रसाद सिंह यांना या सगळ्या घटनाक्रमावर विश्वासच बसत नाहीय. ते म्हणाले की, मी धनखड यांना भेटून संध्याकाळी 6 च्या सुमारास सर्वात शेवटी निघालो. त्यांची प्रकृती चांगली होती. त्यांनी राजीनामा देण्याचे कुठलेही संकेत दिले नव्हते. राज्यसभेचे चेअरमन असं सुद्धा म्हणाले की, त्यांचा एका समितीत समावेश केला जाणार आहे. त्या बद्दल ते नंतर विस्तृत माहिती देतील.

घडामोडींच्या पाठिमागे एक राजकीय वादळ

वरुन सामान्य वाटणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पाठिमागे एक राजकीय वादळ आकार घेत आहे. सोमवारी सभापती जगदीप धनखड यांनी जस्टिस वर्मा यांच्याविरुद्ध विरोधी पक्षाच्या सदस्यांची महाभियोग प्रस्तावाची नोटीस स्वीकारली. लोकसभेत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांच्या 100 पेक्षा जास्त खासदारांनी जस्टिस वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्तावाच्या नोटिसवर स्वाक्षरी केली आहे.

कोऱ्या कागदावर कसली स्वाक्षरी

सोमवारी संध्याकाळी संसदेत राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाबाहेर खूप घडामोडी घडत होत्या. बऱ्याच बैठका झाल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप खासदार राजनाथ यांच्या कार्यालयात जायचे आणि काही न बोलता निघून गेले. एका भाजप खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, कोऱ्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. महाभियोग प्रस्ताव सर्वातआधी राज्यसभेत आणणार म्हणून विरोधी पक्षाचे खासदार उत्साहात होते. राज्यसभेचे सभापती भारताचे उपराष्ट्रती असतात. प्रोटोकॉलनुसार सरकारमध्ये लोकसभा अध्यक्षापेक्षा त्यांचं पद मोठं आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.