उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले असले तरी, पण…; विनायक राऊतांचा जावडेकरांवर पलटवार

उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहेत, अशी टीका भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. जावडेकरांच्या या टीकेला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले असले तरी, पण...; विनायक राऊतांचा जावडेकरांवर पलटवार
विनायक राऊत
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 4:39 PM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली: उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहेत, अशी टीका भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. जावडेकरांच्या या टीकेला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाले असले तरी ते सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, असा पलटवार विनायक राऊत यांनी केला आहे.

विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री झाले असले तरी ते सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे टीका करण्याची गरज नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला.

सरकार पाच वर्ष पूर्ण करणार

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये ठाकरे सरकार कोसळण्याची भविष्यवाणी केली आहे. राऊत यांनी त्यावर दोन दिवसांपूर्वीच उत्तर दिलं होतं. हवेवरची भविष्यवाणी करण्याचा ठेका फक्त नारायण राणे यांनीच घेतला आहे. त्यांना आम्ही काडीची देखील किंमत देत नाही. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, असं त्यांनी म्हटलं होतं.

जावडेकर काय म्हणाले?

भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली. राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्यातील आघाडी सरकारने केंद्राने केलेली कामही आपल्या खात्यात मांडली आहेत. हे संधीसाधू सरकार आहे. या सरकारला मी नवे नाव देत आहे. महाविश्वास घातकी आघाडी सरकार असं या सरकारचं मी नामकरण करत आहे, असं जावडेकर म्हणाले. या सरकारच्या अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले आहेत. काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिलं, काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली, असं सांगतानाच ठाकरे हे अपघातांन झालेले मुख्यमंत्री आहेत, असं ते म्हणाले.

जनताच ठाकरे सरकारला बाजूला करेल

राज्य सरकारने इंधन दर कमी करण्यासाठी टॅक्स कमी करण्याची अपेक्षा होती. पण तसे न करता विदेशी दारूमध्ये सूट दिली. यांच्या काळात रझा अकादमीला राजाश्रय मिळाला. ओबीसी, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काहीच केलं नाही. त्यामुळे जनताच या सरकारला बाजूला करेल, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

BJP : उद्धव ठाकरे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, महा विश्वासघातकी आघाडी सरकार – जावडेकर

हल्ली पुढारी नमस्कार सुद्धा करत नाहीत, यांच्या बापाचे काय जाते कळत नाही; अजितदादांचे जोरदार आसूड

‘आमच्या कामावर अमित शाह समाधानी’, चंद्रकांत पाटलांकडून संघटनात्मक बदलांच्या चर्चेला पूर्णविराम

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.