दिवाळी फटक्यांबर बंदी म्हणून पठ्ठ्यानं केला भन्नाट जुगाड, VIDEO पाहून पोट धरून हसाल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 08, 2020 | 11:00 AM

दिवाळीसारख्या (Diwali) मोठ्या सणामध्येही देशातील बर्‍याच राज्यांनी फटाके वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे.

दिवाळी फटक्यांबर बंदी म्हणून पठ्ठ्यानं केला भन्नाट जुगाड, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Follow us

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) जीवघेण्या संसर्गामुळे यंदा सगळे सण साध्या पद्धतीनं साजरे करावे लागले. अशात दिवाळीसारख्या (Diwali) मोठ्या सणामध्येही देशातील बर्‍याच राज्यांनी फटाके वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. यामध्ये राजस्थान, दिल्ली, ओडिशा, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात अशा राज्यांचा समावेश आहे. पण यावरही लोकांनी भलतीच आयडिया शोधून काढली आहे. (viral video firecrackers banned on diwali then man burst baloons with fire)

सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहा. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. कोरोनाच्या कठीण काळातही अनेक मजेदार पोस्ट आणि लॉकडाऊनच्या नियमांवर शक्कल लावल्याच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक प्रकार समोर आला आहे.

फटाक्यांवरील बंदीमुळे नियम मोडणाऱ्यांवर आणि फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पण भारतीय जुगाडसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी मजेदार प्रकारचे फटाके शोधले आहेत. तुम्ही व्हीडिओमध्ये पाहू शकता. काहींनी फुग्यांची माळ तयार करत दोरीला आग लावली. याने एक-एक करून फुगे फुटले आणि त्याचा फटाक्यांसारखा आवाज आला.

सोशल मीडियावर हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला असून लोक मेजेदार कमेंट्सही करत आहेत. नेटकऱ्यांच्या हा व्हीडिओ चागंलाच पसंतीस पडला असून अनेकजण हा शेअरही करत आहेत.

इतर बातम्या –

बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल

रुग्णवाहिकेला रस्ता करुन देण्यासाठी ‘तो’ ट्रॅफिक पोलीस दोन किलोमीटर धावला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

(viral video firecrackers banned on diwali then man burst baloons with fire)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI