.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील पहिल्या व्हर्च्युअल ड्रोन युनिव्हर्सिटीचे झाले उद्घाटन; ‘या’ क्षेत्रासाठी होणार मोठा फायदा

देशातील पहिल्या ड्रोन व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याचे फायदेही सांगितले.

देशातील पहिल्या व्हर्च्युअल ड्रोन युनिव्हर्सिटीचे झाले उद्घाटन; 'या' क्षेत्रासाठी होणार मोठा फायदा
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 06, 2022 | 4:09 PM
Share

चेन्नईः सध्याच्या जगात तंत्रज्ञान प्रचंड वेगाने प्रगत होते आहे. त्याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे चेन्नईमध्ये पहिल्या व्हर्च्युअल ड्रोन युनिव्हर्सिटीचे उद्घाटन करण्यात आले आहे. चेन्नईमधील अग्नी कॉलजे ऑफ टेक्नॉलॉजी कृषी क्षेत्रासह देशातील संरक्षण दलामध्येही ड्रोनचा कसा वापर केला जाणार असल्याची गोष्ट केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ड्रोनच्या वापराबद्दल आणि त्याच्या योगदानाबद्दल माहिती दिली.

यावेळी ड्रोनच्या माध्यमातून सर्वसामान्यांसह देशातील कृषी, संरक्षण दल आणि इतर गोष्टींसाठी ड्रोनचा कसा वापर होणार आणि त्याचा फायदा देशातील लोकांना कसा होणार हेही यावेळी सांगण्यात आले.

देशातील पहिल्या ड्रोन व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याचे फायदेही सांगितले.

यावेळी त्यांनी विविध क्षेत्रात ड्रोनचा कसा वापर केला जाऊ शकतो. त्याचा फायदा देशासह शेतकरी, देशातील सैनिक आणि इतर गोष्टींसाठी त्याचा कसा फायदो होणार हेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी ड्रोनचा मोठा फायदा होणार आहे. शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना ड्रोनचा कसा फायदा आणि त्याचा कसा वापर केला जातो.

याविषयीही माहिती देण्यात आली. ड्रोनमुळे कमी प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करून शेतीच्या जास्त क्षेत्रात त्याची फवारणी केली जाऊ शकते. याचे प्रात्यक्षिकही या उद्घाटनवेळी दाखवण्यात आले.

शेतीसाठी ड्रोनच्या वापर कीटकनाशकांच्या फवारणीसाठी केला गेला तर त्याचा वापर कमी होऊन त्याचा फायदा शेतीसाठी जास्त होणार आहे.

व्हर्च्युअल ड्रोन युनिव्हर्सिटीचे उद्घाटन करताना अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, या विद्यापीठात वापरण्यात येणारे ड्रोन हे उच्च तंत्रज्ञानातून त्यांची निर्मिती केली गेली आहे.

त्यामुळे याचा फायदा शेतीसह संरक्षण विभागालाही होणार आहे. देशातील सीमारेषेवर दहशतवाद्यांकडून असलेला धोका या ड्रोनच्या माध्यमातून टाळता येणार आहे. तसेच दहशतवादी कारवाईविरोधात या ड्रोनचा कशा प्रकारे वापर केला जातो. त्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

तीन महिन्यापूर्वी ड्रोन स्टार्टअप गरूड एरोस्पेसकडून रणनिती आखण्यासाठी या अशा प्रकारचे ड्रोन देण्यात आले होते. त्याच ड्रोनचे फायदेही यावेळी सांगण्यात आले.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर