RSS: स्वातंत्र्यलढ्यात खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता का? काय आहे सत्य? संघाच्या जाणकारांचं काय मत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण केले. याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सध्या गेल्या 52 वर्षांत नागपूरच्या मुख्यालयात तिरंगा का फडकावला नाही, असा प्रश्न विचारण्यात येतो आहे. खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता का, याचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

RSS: स्वातंत्र्यलढ्यात खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता का? काय आहे सत्य? संघाच्या जाणकारांचं काय मत?
संघाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग किती?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 3:17 PM

नवी दिल्ली – देशाने आज आपला 75 वा स्वातंत्र्यदिन ( 75th Independence day)साजरा केला. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यंदा संपूर्ण देशात या स्वातंत्र्यदिनाचा चांगलाच उत्साहही पाहायला मिळाला. नेहमीप्रमाणेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने इतिहासांची पाने उलटली गेली आणि या लढ्यासाठी बलिदान करणाऱ्या वीरांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख या निमित्ताने झाला. मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, भगचत सिंह, उधम सिंह, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासारख्या अनेक नेत्यांचे आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान या स्वातंत्र्यलढ्यात होते. मात्र या सगळ्यात देशातील एक संघटना अशीही आहे, ज्यांना नेहमी त्यांच्या स्वातंत्र्यातील योगदानाबाबत प्रश्न विचारण्यात येतो. ज्या संघटनेच्या देशभक्तीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येतो. ही संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, (Rashtriya Swayamsevak Sangh)याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण केले. याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सध्या गेल्या 52 वर्षांत नागपूरच्या मुख्यालयात तिरंगा का फडकावला नाही, असा प्रश्न विचारण्यात येतो आहे. खरंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ( Freedom fight)सहभाग नव्हता का, याचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक विजय त्रिवेदी यांच्या ‘संघम शरणम गच्छामी’ या पुस्तकातील ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ या प्रकरणात याची सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.

संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली. या संघटनेचे संस्थापक होते डॉ. केशव बळीराम हेडगेवार. या संघटनेची स्थापना जेव्हा करण्यात आली, त्यावेळी भारत स्वातंत्र्याची लढाई लढत होता. संघाचे जाणकार सांगतात की डॉ. हेडगेवार यांना स्वातंत्र्यलढ्यात दोनदा तुरुंगात जावे लागले होते. भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवे, हे पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार यांनी सांगितले होते. इतकेच नाही तर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी त्यांचे सरसंघचालक पदही सोडले होते. याचा अर्थ असा होता की, संघटनेच्या पातळीवर न्वहे तर प्रेरणा म्हणून स्वयंसेवकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. अशा प्रकाराने हजारो स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, इतकेच नाही तर काही जणांनी त्यासाठी बलिदानही केले. या तर्कानंतर विरोधकांनी हेडगेवार हे स्वातंत्र्यलढ्यात होते हे मान्य केले असेल. मात्र दुसरे सरसंघचलाक माधव सदा्शिव गोळवलकर यांनी स्वयंसेवकांना यासाठी परावनगी दिली नाही, असाही प्रवाद आहे. मात्र असे अनेक प्रसंग आहेत, ज्यावेळी गोळवलकर यांनी स्वयंसेवक हे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊ शकतात, असे सांगितले.

संघटना म्हणून स्वातंत्र्यलढ्यात नव्हता, पण स्वयंसेवक लढ्यात – निलांजन

द आरएसएस हे पुस्तक लिहिणारे वरिष्ठ पत्रकार नालंजन मुखोपाध्याय यांनी सांगितले की, डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला आणि ते त्यासाठी जेलमध्येही गेले. मात्र संघटना म्हणून संघ स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाला नाही. यावर नीलांजन यांचे म्हणणे आहे की, त्यावेळी अशा अनेक संघटना होत्या ज्यांनी प्रत्यक्षपणे स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नव्हता. ज्या संघटनांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही, ते स्वातंत्र्याच्या विरोधात होते, असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. 1930 साली ज्यावेळी लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्य स्वाकीर केले होते. ही बातमी हेडगेवार यांना कळाल्यानंतर, त्यांनी संघातील सर्व शाखांवर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे संदेश 1930 सालीच पाठवले होते. तसेच स्वातंत्र्याचा अर्थही स्वयंसेवकांना समजावून सांगा असेही सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

इंग्रजांना संघाने साथ दिली हे चुकीचे – कश्यप

संघाने स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न होता इंग्रज आणि इंग्लंडच्या राजसत्तेला साथ दिली, असा आरोप सातत्याने संघावर करण्यात येतो. मात्र संघाने इंग्रजांना साथ दिली हा आरोप अत्यंत चुकीचा आहे, असे संघाचे 1947 ते 1960 या काळात प्रचारक राहिलेल्या देवेंद्र कश्यप यांचे म्हणणे आहे. संघटना म्हणून संघ या लढ्यात सहभागी झाला नसला तरी स्वयंसेवक या लढ्यात होतेच, असे त्यांचे म्हणणे आहे. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार सुरुवातीपासूनच इंग्रजांच्या विरोधात होते. ‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ हे पुस्तक लिहिणारे सहगल सांगतात की, संघ स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या संघटना आणि पक्षांच्या वतीने आयोजित आंदोलने आणि सत्याग्रहांत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. हे वास्तव असताना संघाने काहीच केले नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचे सेहगल यांचे म्हणणे आहे.

काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थामुळे संघावर अन्याय – सहगल

काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी, संघ स्वयंसेवकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाचा उल्लेखच नाकारला, स्वयंसेवकांचा सहभागच नसल्याचे समाजमनावर गोंदले, असे सहगल यांचे म्हणणे आहे. यात स्रावधिक अन्याय हा डॉ. हेडगेवार यांच्यावर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ज्या व्यक्तीने अखेरच्या क्षणापर्यंत स्वातंत्र्यलढ्यासाठी संघर्ष केला. त्याच्याबाबत ना कुणी आत्मचरित्र लहिले ना कुणी त्यांचे कर्तृत्व वर्तमानपत्रातून सांगण्याचा प्रयत्न केला, असे सहगल यांचे म्हणणे आहे.

पूर्ण स्वातंत्र्य ही संघाची पहिली मागणी – सहगल

1930 पूर्वी काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य याचा उच्चारही कधी केला नव्हता. असे नरेंद्र सहगल यांचे म्हणणे आहे. पूर्ण स्वातंत्र्याचा पहिला उल्लेख हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केला आणि हेच त्याचे उद्दिष्ट्य होते. राष्ट्पिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या असहकार आंदोलनात, डॉ. हेडगेवार यांनी सहा हजारंहून अधिक स्वयंसेवकांसह सहभाग घेतला होता. तसेच सत्याग्रहही केला होता. त्यासाठी त्यांना 9 महिने सश्रम कारावासाची शिक्षाही झाली होती. 1897 साली झालेल्या राणी व्हिक्टोरियाच्या वाढदिवासाच्या जल्लोषाला आणि 19909 साली झालेल्या सम्राट एडवर्ड यांच्या शपथविधी सोहळ्याच्या जल्लोषालाही त्यांनी नागपुरात विरोध केला होता.

अर्धा इतिहास सांगण्याचा होतोय प्रयत्न – मनमोहन वैद्य

संघाचे सहकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य सांगतात की, योजनापूर्वक अर्धाच इताहास सांगण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. भारतातील काहीजण हे 1942 चे आंदोलन आणि काँग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळाले हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतरांनी कुणी त्यासाठी योगदान दिले नाही, असे ठासवण्याचा हा प्रयत्न आहे. हा संकुचित विचार आहे, असे वैद्य यांचे म्हणणे आहे. 1921 साली जेव्हा प्रांतीय काँग्रेस बैठकीत क्रांतीकारकांची निंदा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावेळी डॉ. हेडगेवार यांनी त्याला विरोध केला होता. त्यांच्या या विरोधामुळे हा प्रस्ताव मागे घेण्यात आला होता. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य अणे हे होते. हेडगेवार हे क्रांतिकारकांना देशभक्त मानत होते, त्यामुळे ते निंदेचा विषय ठरलेले आहेत. क्रांतिकारकांच्या पद्थतीवर आक्षेप असू शकतो, मात्र त्यांच्या देशभक्तीवर शंका घेणे, हा गुन्हा आहे, असे हेडगेवारांचे मत होते.

मीठाच्या सत्याग्रहात संघाचे योगदान

गुजरातच्या दांडी येथील मीठाच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्याचा निर्णय संघाने घेतला होता. डॉ. हेडगेवार यांनी वैयक्तिकरित्या आणि स्वयंसेवकांसह या आंदोलनात भाग घेतला होता, असे मनमोहन वैद्य यांनी सांगितले आहे. २१ जुलैला झालेल्या सत्याग्रहात सुरुवातीला 3-4हजार जणं होते, नंतर मात्र ही संख्या 10 हजारांवर पोहचली होती. त्या काळात संघाचे काम सुरु राहावे यसाठी त्यांनी सरसंघचालक पदाची जबाबदारी त्यांचे मित्र डॉ. परांजपे यांच्याकडे सोपवली होती. तसेच बाबासाहेब आपटे आणि बापूराव भेदी यांना शाखांमध्ये प्रवासाची जबाबदारी सोपवली होती.

काँग्रेसच्या एका गटाचे संघाचे समर्थन, त्यात सरदार पटेलांचाही समावेश

सरदार पटेल यांच्यासह काँग्रेसमधील असा एक गट होता ज्यांना संघाप्रती ममत्व होते. संघाचे स्वयंसेवक हे देशभक्त आहेत, अशी त्यांची धारणा होती. गांधी हत्येनंतर काँग्रेसमधील विरोधकांना संधी मिळाली आणि त्यांनी संघ कार्यकर्त्यांना अटक केली. नंतर त्यांच्याच लक्षात आले की संघावर बंदी घालणे योग्य ठरणार नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर झालेली चौकशी आणि सर्व बाबी पाहिल्यानंतर सरदार पटेल म्हणाले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यात कुठल्याही प्रकारे सहभाग नाही.

1942 चा सत्याग्रह आणि महात्मा गांधी यांच्याकडून कौतुक

1942 च्या चले जाव चळवळीवेळी, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची तीव्र इच्छा असू शकते, असे गोळवलकर गुरुजी यांनी म्हटले होते. ज्या काँग्रेसने हे आंदोलन करण्याचा निश्चय केला आहे, त्यांनी हा विचार केला नाही की देशात इतरही अशा संघटना आहेत, ज्यांना इंग्रजांच्या पाशातून देशाला मुक्त करण्याची इच्छा आहे. असे असतानाही नेहमीप्रमाणे स्वयंसेवक वैयक्तिकरित्या काँग्रेसच्या नेतृत्वात हा आंदोलनात सहभागी होतील आणि होत राहतील. सप्टेंबर 1947 साली, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका महिन्यटाने महात्मा गांधी यांनी गोळवलकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर गोळवलकर दिल्लीला तातडीने आले आणि् बिल्रा भवनात त्य़ांची गांधी यांच्याशी भेट झाली होती. गांधी संघाच्या एखाद्या कार्यक्रमात जाऊन स्वयंसेवकांना संबोधित करणार होते. त्याप्रमाणे 16 सप्टेंबर 1947 रोजी बिरला भवन जवळील एका मैदानावर 500 स्वयंसेवकांसमोर महात्मा गांधी यांचे भाषण झाले होते. त्यात त्यांनी संघाच्या कामाचे कौतुक केले होते.

स्वातंत्र्यलढ्यात स्वयंसेवकांचा मोठा सहभाग

संघाचे जाणकार सांगतात की, स्वातंत्र्यलढ्यात संघाच्या सक्रिय आंदोलनातील सहभागाला नाकारणारे हे विसरतात की, संघटनेच्या रुपात अप्रत्यक्षपणे संघाने या लढ्यात मोठे काम केले आहे. संघाच्या वैचारिक विरोधकांनी नेहमी संघावर टीका केली, त्याचप्रमाणे लिखाण केले आणि स्वातंत्र्याचे श्रेय एकट्या काँग्रेसकडे देण्याचा नेहमी प्रयत्न करण्यात आला. असे संघाच्या जाणकारांचे मत आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.