आम्ही कराची बंदर उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्णपणे तयार होतो, फक्त…, डीजीएमओच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा खुलासा
शनिवारी दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, या सर्व पार्श्वभूमीवर आज तीन्ही सैन्य दलाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात आली.

भारतानं सात मे रोजी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तावर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, या हल्ल्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने देखील भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला, त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानचे अनेक एअर बेस उद्ध्वस्त झाले, अखेर शनिवारी दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, या सर्व पार्श्वभूमीवर आज तीन्ही सैन्य दलाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएनओ) व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांनी सांगितलं की, 9 मे रोजी पाकिस्तानचं कराची बंदर आमच्या निशाण्यावर होतं, कराची बंदराला लक्ष्य बनवण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार होतो, आम्ही कराची बंदर उद्ध्वस्त करण्यासाठी तयार होतो, आम्ही फक्त सरकारच्या आदेशाची वाट पाहत होतो, असं एएन प्रमोद यांनी म्हटलं आहे. भारतीय नैदल असा हल्ला करण्यासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं.
22 एप्रिल रोजी पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर आम्ही लगेचच कारवाईला सुरुवात केली. आम्ही समुद्रात युद्धनौका, पाणबुड्या आणि लढाऊ विमाने पूर्णपणे युद्धसज्जतेने तैनात केली होती. आम्ही कराची बंदर उद्ध्वस्त करण्यासाठी तयार होतो, आम्ही सरकारच्या आदेशाची वाट पाहत होतो, कराची बंदर आमच्या टप्प्यात होतं असंही यानेळी एएन प्रमोद यांनी म्हटलं आहे.
40 पाकिस्तानी सैनिक ठार
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, भारताच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार देखील करण्यात आला, त्यानंतर भारतानं दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक मारले गेल्याची माहिती देखील डीजीएमओच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्याची 9 स्थळं उद्ध्वस्त करण्यात आली असून, 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा यामध्ये खात्मा झाला आहे.
