AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal ByPoll : पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींची विक्रमी विजयाकडे वाटचाल, आता लक्ष्य 2024!

भवानीपूर विधानसभा मतदारसंघात पार पडत असलेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विजय निश्चित आहे. ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोषाला सुरुवातही केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी यांचं वजन वाढणार हे निश्चित आहे. आता त्यांची नजर ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर असणार आहे.

West Bengal ByPoll : पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींची विक्रमी विजयाकडे वाटचाल, आता लक्ष्य 2024!
ममता बॅनर्जी
| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 1:09 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपचं कडवं आव्हान मोडून विजयी पताका फडकवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची पोटनिवडणुकीत विक्रमी विजयाकडे वाटचाल सुरु आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघात पार पडत असलेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विजय निश्चित आहे. ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोषाला सुरुवातही केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी यांचं वजन वाढणार हे निश्चित आहे. आता त्यांची नजर ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर असणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ममता बॅनर्जी यांच्या विजयाचं स्वागत केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं भाजपला धूळ चारली होती. त्यानंतर आता ममता बॅनर्जीही विक्रमी विजय नोंदवण्याच्या तयारीत आहेत. (CM Mamata Banerjee’s victory in Bhawanipur Assembly by-election is certain)

विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केल्यानं ममता बॅनर्जी यांचं राष्ट्रीय राजकारणातील वजन वाढलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात उपस्थिती दाखवली होती. तसंच विरोधकांना एकत्र आणण्याच्या कामातही त्या लागल्या होत्या. इतकंच नाही तर गोव्यासारख्या राज्यातही आता तृणमूल काँग्रेसनं विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गोव्यासह अन्य राज्यांतही तृणमूल काँग्रेसनं आपली राजकीय ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

विरोधकांची मोट बांधण्यासाठी तृणमूल प्रयत्नशील

विधानसभा पोटनिवडणुकीतील ममता बॅनर्जी यांचाय विजय हा बंगालपूरता मर्यादित असणार नाही. राष्ट्रीय राजकारणात ममता बॅनर्जी यांचं स्थान अधिक गडद होणार आहे. तसंच विरोधकांची मोट बांधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अधिक गती प्राप्त होणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करताना ” ममता दीदी जी की जीत है वही तो सत्यमेव जयते की रीत है” असं म्हटलंय. त्यामुळे पुढील काळात भाजप विरोधात पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला तर संयोजक म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर विरोधकांच्या एकजुटीचा त्या चेहरा बनू शकतील. महत्वाची बाब म्हणजे याबाबत तृणमूल काँग्रेसनं यापूर्वीच जाहीर केलं आहे की ममता बॅनर्जी देशाला मार्ग दाखवतील. अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेस शांत बसली असेल तर टीएमसी बसून राहणार नाही, असं वक्तव्य करून तृणमूल काँग्रेसची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.

गोव्यात माजी मुख्यमंत्री तृणमूलच्या गळाला

ममता बॅनर्जी यांनी गोवा विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गोव्यात तृणमूल काँग्रेसमध्ये चैतन्य संचारलं आहे. ममता बॅनर्जींनी निवडणुकीची घोषणा करताच गोव्यात ममता दीदींचे पोस्टर झळकले आहे. पणजी विमानतळाच्या परिसरात हे पोस्टर झळकले असून त्यावर गोयंची नवी सकाळ असं लिहिलं आहे. तसेच विमानतळाजवळ तृणमूल कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं आहे.

माजी मुख्यमंत्री फलेरो तृणमूलमध्ये

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार लुइजिन्हो फलेरो यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तृणमूलला मोठं बळ मिळालं आहे. फलेरो यांनी आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेऊन त्यांच्या उपस्थित तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे फलेरो हे गोव्यातील तृणमूलचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि चेहरा असणार असल्याचं सांगितलं जात आहे. गोव्यात 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यापार्श्वभूमीवर टीएमसीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

इतर बातम्या :

फडणवीसांनी नुकसानीची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला, देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला

VIDEO: कर्नाटक सरकारचा रिपोर्ट खोटा, आघाडी सरकार गप्प का?; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

CM Mamata Banerjee’s victory in Bhawanipur Assembly by-election is certain

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.