Diwali 2025 : यंदा दिवाळीत फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी; कसे तयार होतात? काय आहे त्यांचं वैशिष्ट्य? जाणून घ्या A टू Z माहिती
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यास परवानगी तर दिली आहे. परंतु फक्त ग्रीन फटाकेच फोडण्यास ही परवानगी दिली आहे. हे ग्रीन फटाके म्हणजे काय, ते कसे बनवले जातात, त्यांची विक्री कुठे होते, पारंपरिक फटाक्यांपेक्षा ते कसे वेगळे आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

फटाक्यांशिवाय दिवाळी हा सण अपूर्णच मानला जातो. फटाके आणि त्यामुळे होणारं वायू, ध्वनी प्रदूषण हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. फटाक्यांवर निर्बंध आणण्याची मागणी सातत्याने केली जातेय. याच फटाक्यांसंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरात ग्रीन फटाके विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने काही कडक अटींवर परवानगी दिली आहे. परंपरेबरोबरच पर्यावरणही जपण्यासाठी न्यायालयाने हे पाऊल उचललं आहे. ग्रीन फटाक्यांमुळे कमी प्रदूषण होतं. त्यामुळे हे ग्रीन फटाके वाजवण्यास दिवाळीपूर्वी काही दिवस आणि प्रत्यक्ष सणांच्या दिवशी काही तास परवानगी असेल. 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान फटाक्यांच्या विक्रीला परवानगी असेल. ही एक चाचणीच असून निर्धारित...
