Explained : चीनने ब्रह्मपुत्रच पाणी रोखलं तर काय? पाकिस्तानच्या धमकीत अजिबात दम नाही, एकदा हे वाचा
Explained : भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानकडून आता चीन संभवत: ब्रह्मपुत्र नदीच पाणी रोखू शकतो अशी धमकी दिली जात आहे. आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी तथ्यांच्या आधारावर पाकिस्तानच्या धमकीत अजिबात दम नसल्याच दाखवून दिलय. उलट चीनने ब्रह्मपुत्रेचा जलस्तर कमी केला, तर ते भारताच्या फायद्याचच आहे, कसं ते समजून घ्या.

भारताने सिंधू जल करार स्थगित करुन पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे त्यांचा थयथयाट सुरु आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात आहेत. भारताला घाबरवण्यासाठी पाकिस्तानने एक नवीन टूम सोडली आहे. भारताने जसा सिंधू जल करार स्थगित केला, तसं चीन संभवत: ब्रह्मपुत्र नदीच पाणी रोखू शकतो, असा पाकिस्तानचा दावा आहे. आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा या धमकीवर तथ्यांसह उत्तर दिलं आहे. त्याने पाकिस्तानचे डोळे उघडतील.
भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्र नदीचा प्रवाह चीनवर अवलंबून आहे ही पाकिस्तानची थ्योरी हिंमत बिस्वा सरमा यांनी फेटाळून लावली. त्यांनी X वर पोस्ट करुन विस्ताराने या बाबत माहिती दिली आहे. ब्रह्मपुत्र नदी भारतात आत्मनिर्भर आहे. भारतात ब्रह्मपुत्रेला आपला प्रवाह वाहता ठेवण्यासाठी चीनवर अवलंबून राहण्याची अजिबात गरज नाही. ब्रह्मपुत्रेच्या एकूण जल प्रवाहात चीनच फक्त 30 ते 35 टक्के योगदान आहे. ग्लेशियरच वितळणं आणि मर्यादीत पाऊस याचा समावेश आहे असं हिंमत बिस्वा सरमा यांनी सांगितलं.
पाकिस्तानच्या दाव्यात का दम नाही ते समजून घ्या
भारताने जेव्हापासून सिंधू जल करार स्थगित केलाय, तेव्हापासून पाकिस्तानच्या धमक्या सुरु आहेत. आता चीनच्या नावाने भारताला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. “चीनने ब्रह्मपुत्रच पाणी रोखलं तर?. ही खोटी कल्पना भितीने नाही, तर तथ्य आणि राष्ट्रीय स्पष्टतेच्या आधारावर मोडूया. ब्रह्मपुत्र नदी भारतात कमी होत नाही, उलट वाढते. चीन ब्रह्मपुत्रच्या एकूण प्रवाहात केवळ 30 ते 35 टक्के योगदान देतो. त्यात हिमनद्या वितळून येणारं पाणी आणि मर्यादीत पाऊस याचा समावेश आहे. उर्वरित 65 ते 70 टक्के पाणी भारतातच तयार होतं” त्यामागच कारणही त्यांनी X वर सांगितलं.
भारतात ब्रह्मपुत्रेच पाणी कसं तयार होतं?
“अरुणाचल प्रदेश, असम, नागालँड आणि मेघालयमध्ये मान्सूनचा मुसळधार पाऊस होतो. सुबनसिरी, लोहित, कामेंग, मानस, धनसिरी, जिया-भाराली, कोपिली, मेघालयची खासी, गारो आणि जयंतिया, डोंगररागांमधून येणाऱ्या कृष्णाई, दिगारू, कुलसी आदि सहायक नद्या भारतातील ब्रह्मपुत्र नदीचा प्रमुख जल स्रोत आहेत. भारत-चीन सीमेवर (तूतिंग) येथे ब्रह्मपुत्र नदीचा प्रवाह 2,000–3,000 घन मीटर/सेकंद असतो गुवाहाटी आणि आसामच्या मैदानी क्षेत्रात हा प्रवाह मान्सूनच्यावेळी 15,000–20,000 घन मीटर/सेकंद असतो” असं हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं.
चीनने उलट ब्रह्मपुत्रेचा जलस्त्रोत कमी केला, तर ते भारताच्या फायद्याच
ते म्हणाले की, ‘ब्रह्मपुत्र नदी भारतात प्रवेश केल्यानंतर सशक्त होते. ही एक भारतीय वर्षा-पोषित नदी प्रणाली आहे. ब्रह्मपुत्रेच पाणी कुठल्या ठराविक एका स्त्रोतांवर अवलंबून नाही. पाकिस्तानने हे सत्य जाणून घेणं आवश्यक आहे की, जर चीनने कधी ब्रह्मपुत्रेचा जलस्तर कमी केला, तर ते भारताच्या फायद्याचच असेल. कारण दरवर्षी पावसाळ्यात आसाममध्ये येणाऱ्या भीषण पुरात लाखो लोक विस्थापित होतात. मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
