Explainer: भारताचा तांदळाचा इतिहास काय ? ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या तांदळावर टॅरिफ लावण्याची धमकी नुकतीच दिलेली आहे. परंतू अमेरिकेत बिर्याणीसाठी भारती तांदूळ पसंद केला जातो. भारताच्या तांदुळाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून तुम्हीही म्हणाल आमच्या तांदुळाचा आम्हाला अभिमान आहे.

Explainer : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारतीय तांदुळामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे. भारताने अमेरिकेच्या बाजारात त्यांचा तांदुळ डम्प करु नये असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी भारतीय तांदुळावर टॅरिफ लावून या समस्येतून मार्ग काढला जाईल असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतू भारतीय तांदुळावर टॅरिफची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना हे माहिती आहे का अमेरिकेतील भारतीय तांदुळाशिवाय राहू शकतील काय ? अमेरिकेत बिर्याणीसाठी भारतीय बासमती तांदुळाचा आधार घेतात. तसेच अमेरिकेतील तांदुळाच्या जाती भारतीय बासमतीची जागा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे भारतीय तांदुळाच्या सुंगधाशिवाय बिर्याणीची डीश कशी सजणार असा सवाल केला जात आहे.
भारताला त्याच्या तांदुळाचा का अभिमान आहे ?
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या धमकीनंकर इंडियन राईस एक्स्पोर्ट्स फेडरेशनने ( Indian Rice Exporters Federation ) या संदर्भात विस्तृत स्पष्टीकरण देखील जारी केले आहे. ज्यात म्हटले आहे की भारताच्या सोबत अमेरिकेच्या तांदळाचा व्यापार पूर्णपणे देशाच्या ग्राहकाच्या मागणी आणि त्यांची खाण्याची सवयी आणि गरजांवर अवलंबून आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा काही उपयोग नाही.परंतू भारतीयांना त्यांच्या तांदुळाच्या गुणवत्तेवर का अभिमान आहे ? भारतीय तांदुळात असे काय खास आहे आणि का तो इतका लोकप्रिय आहे हे पाहूयात…
भारतीय संस्कृती आणि तांदुळाचा इतिहास
भारतीय तांदुळ खास आहे. कारण याची कहाणी भारताच्या संस्कृतीशी जोडलेली आहे. आणि याचा इतिहास 5000 वर्षे जुना आहे. हजारो वर्षे पुरातन सिंधू खोरे संस्कृतीत देखील तांदुळाच्या शेतीचे पुरावे मिळतात. तसेच हे सुद्धा समजते की आपल्या पूर्वजांनी नदीच्या सुपिक प्रदेशात या धान्याची शेती कशी केली होती. भारतीय वेदात याचे पुरावे आहेत की तांदुळ केवळ जेवणाचा भाग नव्हता ते पूजा आणि प्रार्थनेचाही भाग होता. आजही पूजेत ज्या अक्षता म्हणून वापरल्या जातात ते तांदुळच असतात. त्यामुळे तांदुळ येथील संस्कृतीशी अशा एकरुप झालेला आहे.
बासमती शिवाय बिर्याणीला कशी चव येणार
आता मुघलकाळातील इतिहासात डोकावतानाही जहागीर यांच्या शासनकाळात सर्वात सुंगधीत तांदुळाला ‘बासमती’हे नाव मिळाले. याचा अर्थ ‘महकदार’ वा ‘सुगंधित’ असा आहे. या तांदुळाची शेती जितक्या काळजीपूर्वक केली जात होती. तेवढ्याच काळजीने धानातून तांदुळ काढले जात होते. यास तयार करण्याची खास पद्धत आहे. बासमती संदर्भात म्हटले जाते की हे खूपच लाडाकोडात पिकवले जाणारे धान्य आहे. मिथिलांचल मध्ये या संदर्भात एक म्हण प्रचलित आहे. ती अशी की ‘धान बासमती, कूटे आसकत्ती, बनावे भागवंती’…बासमती धान्याला हळूवार आळसासारखे कांडावे लागते आणि बनवणारा देखील भाग्यवान असतो !
बासमतीच्या सुंगधीत कथेचा प्रवास
बासमती तांदुळ पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक भागात पिकवला जातो. मुघलांनी या राजसी भोजनाचा भाग बनवले. आणि त्याच्या खासियतमुळेच तो लवकरच युरोपात पोहचला. १९ व्या शताब्दीच्या शेवटपर्यंत भारत ब्रिटनला तांदुळ पुरवठा करत होतो. जे औद्योगिक क्रांती दरम्यान मजूरांचे मुख्य भोजन होते. आज भारतात पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या हजार प्रकारच्या जाती उगवल्या जातात. त्यातील आता 6 हजार जाती उरल्या आहेत. आणि प्रत्येक क्षेत्रात त्याच्या विशेष जाती आणि उपयोग आहेत.
भारतील खास तांदुळाच्या जातींची नावे
भारतात तसे पाहिले तर हजारो प्रकारच्या तांदुळाचे प्रकार आहेत. त्यात मुख्य रुपाने दाण्याचा आकार, लांबी, मध्यम, छोटे आणि रंगानुसार सफेद, तपकीरी, काळा, लाल आणि प्रोसेसिंग आधारावर अरवा म्हणजे कच्चा, उसना म्हणजे अर्धा उकडलेला, असा ओळखला जातो. जातीच्या आधारावर बासमती, सोना मसूरी, इंद्रायणी, आंबेमोहर, पंकज, मालती, पोन्नी आणि मणिपूरचे काळे तांदुळ (चाक-हाओ) अशा अनेक स्थानिक आणि लोकप्रिय जाती सामील आहेत.
172 देशांचे पोट भरतोय भारतीय तांदुळ
भारत आज जगातल्या अनेक देशांचे पोट भरत आला आहे. भारतीय तांदुळाचा सुंगध जगातल्या 172 देशांत पसरत आहेत. ज्यात अमेरिकेच्या फ्यूजन डीशेस पासून आफ्रीकेच्या ताटात याला वाढले जाते. ‘इंडियन राईस एक्सपोट्स फेडरेशन’ च्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वात मोठा तांदुळ उत्पादक देश आहे. आणि आघाडीचा निर्यातकही आहे. भारताचा ‘सोना मसूरी’ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात पसंद केला जातो.
या देशांत भारतीय तांदुळाला मागणी
जॉर्डन
नेदरलँड्स
उत्तरी मॅसेडोनिया
सूदान
सौदी अरब
इराक
इराण
संयुक्त अरब अमीरात
अमेरिका
बांगलादेश
यमन
मलेशिया
सिंगापूर
अफगानिस्तान
नायजेरिया
ब्रुनेई
कुवैत
तांदुळ एक आणि नाव अनेक
शेतात पिकात असेल तर त्याला धान्य, कच्चा असेल तर तांदुळ आणि अनेक प्रांतात तांदुळ शिजवला गेल्यानंतर त्याला भात म्हटले जाते. दूधात टाकून शिजवला तर खीर, दक्षिण आणि पूर्व भारतात पाल, पायसम पायेश म्हटले जाते. तांदुळाला संस्कृत आणि मराठीत तांदुळ, इंग्रजीत राईस आणि धार्मिक कार्यात याला अक्षता, विविध क्षेत्रिय भाषात कुठे पंता भात वा पोइता, भात वा पखला भात नावांनी ओळखला जातो. तांदुळाचे वनस्पती म्हणून शास्रीय नाव ओरीजा सॅटीव्हा आहे.
