AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करोडो लोकांच्या मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट; वाचणार लाखो लोकांचा जीव, अलर्ट कसे काम करणार?

आज 11 वाजून 42 मिनिटांनी सर्वांच्याच मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट आला. प्रत्येकाचाच फोन व्हायब्रेट होऊ लागला. दरम्यान, या इमर्जन्सी अलर्टचा नेमका अर्थ काय आहे? सरकारने हा अलर्ट का जारी केला, ते जाणून घेऊ या....

करोडो लोकांच्या मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट; वाचणार लाखो लोकांचा जीव, अलर्ट कसे काम करणार?
emergency alertImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 02, 2026 | 4:18 PM
Share

Emergency Alert : देशातील कोट्यवधी लोकांच्या मोबाईलमधून 2 मे रोजी अचानक सायरनचा आवाज यायला लागला. अचानकपणे आलेल्या या आवाजामुळे कित्येक लोक घाबरून गेले. लोकांनी फोन हातात घेऊन पाहिल्यावर हा तर एक इमर्जन्सी अलर्ट असल्याचे समोर आले. दरम्यान, हा प्रकार नेमका काय हे अजूनही लाखो लोकांना समजलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आलेला हा अलर्ट नेमका काय होता? त्यामागे नेमके कारण काय होते? हे जाणून घेऊ या…

11 वाजून 42 मिनिटांनी आला मेसेज….

भारत सरकारने लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता एक इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम तयार केली आहे. आणीबाणीच्या काळात, संकटाच्या काळात लोकांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे यासाठी या अलर्टची निर्मिती करण्यात आली आहे. हा अलर्ट येताच तुमचा फोन जोराने वाजतो. फोन जोरात व्हायब्रेट होतो तसेच फोनमध्ये अलर्ट नेमका कशासाठी आहे, ते लिहलेले दिसते. तुमचा फोन सायलेंट असला तरीही या अलर्टचा आवाज येतो. या अलर्ट सिस्टीमच्या चाचणीसाठी आज (2 मे) देशभरातील कोट्यवधी लोकांच्या मोबाईलवर हा अलर्ट मेसेज पाठवला. दुपारी 11 वाजून 42 मिनिटांनी हा अलर्ट टेस्टिंग मेसेज पाठवण्यात आला होता.

नेमका मेसेज का आला होता?

भारत सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या एका एजन्सीने या सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीमच्या परीक्षणासाठी हा मेसेज पाठवला होता. या सिस्टीम अंतर्गत आपत्ती, आणीबाणी तसेच अन्य संकटाच्या काळात लोकांचा सूचना देण्यात येणार आहे. हा आफत्कालीन संदेश दूरसंचार विभागाने (DoT) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने विकसित केला आहे. भूकंप, अतिवृष्टी किंवा अन्य संकटातून लोकांची सुटका वेळेत व्हावी यासाठी या स्टिस्टीमचा वापर केला जाणार आहे.

भविष्यात हा इमर्जन्सी अलर्ट हिंदी, इंग्रजी तेसच इतर प्रादेशिक भाषांमध्ये पाठवला जाणार आहे. अशा प्रकारचा मेसेज आल्यावर लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे. देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी