सौरव गांगुलीच्या हार्ट अटॅकचं राजकीय कनेक्शन?

बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (what is reason behind sourav ganguly's heart attack?)

सौरव गांगुलीच्या हार्ट अटॅकचं राजकीय कनेक्शन?
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 4:02 PM

कोलकाता: बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, गांगुलीच्या या हार्ट अटॅकचं राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने सौरवला दिलेला भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सौरव टेन्शनमध्ये आल्यानेच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. (what is reason behind sourav ganguly’s heart attack?)

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भाजप नेते अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये येऊन दोन दिवस रॅली करून संपूर्ण वातावरण ढवळून काढले होते. शिवाय काही नेत्यांशी त्यांनी चर्चाही केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस दरम्यान चांगलीच चुरस रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भाजपला पश्चिम बंगालमध्ये बळ मिळू नये म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्व खबरदारी घेत असल्याचं चित्रंही दिसत आहे.

सौरवला मुख्यमंत्रीपदाची ऑफर? ममता बॅनर्जी अॅलर्ट

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस दरम्यान शाब्दिक चकमकी झडत असतानाच सौरव गांगुलींला भाजपकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची बातमी धडकली आहे. त्यातच सौरवच्या भाजप नेत्यांशी वाढलेल्या गाठीभेटीमुळे या चर्चेला अधिकच बळकटी मिळताना दिसत आहे. सौरवने भाजपचा प्रस्ताव स्वीकारल्यास पश्चिम बंगालचं सर्व राजकीय समीकरणच बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींनी सौरवला अडचणीत आणण्यासाठी दिलेला भूखंड काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

सौरवला भूखंड दिला पण,…

2013 मध्ये शाळा बनविण्यासाठी राज्य सरकारने सौरवला न्यूटाऊनच्या अॅक्शन एरिया 1 ए मध्ये दोन एकर भूखंड दिला होता. गरीब कुटुंबातील मुलांसाठी या भूखंडावर सौरव शाळा बांधणार होता. हा भूखंड मिळावा म्हणून त्याने सरकारकडे अर्जही केला होता. त्यानंतर त्याला हा भूखंड देण्यात आला होता. अत्यंत कमी किंमतीत सौरवला हा भूखंड देण्यात आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा ऑगस्टमध्ये राज्य सरकारला चिठ्ठी लिहून हा भूखंड परत घेण्याची विनंती केली होती. शाळा बनिवण्याचा विचार बदलल्याचं त्याने या चिठ्ठीत म्हटलं होतं. त्यानंतर डिसेंबरपर्यंत सरकारने या भूखंडावर कोणताच निर्णय घेतला नव्हता.

राजकीय गाठीभेटी

काही दिवसांपूर्वीच सौरवने राजभवनात जाऊन राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सौरवने दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे ममता बॅनर्जीही अॅलर्ट झाल्या. सौरव आणि भाजपमध्ये राजकीय गणिताची खिचडी शिजत असल्याचा अंदाज आल्याने राज्य सरकारने तात्काळ आदेश जारी करत सौरवला देण्यात आलेला भूखंड काढून घेण्याचे आदेश दिले. अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे सौरव तणावत आल्यानेच त्याची प्रकृती बिघडल्याचं बोललं जात आहे. (what is reason behind sourav ganguly’s heart attack?)

संबंधित बातम्या:

 क्रिकेटर सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीची 135 दिवसात तब्बल ‘इतक्या’ वेळा कोरोना टेस्ट

सौरभ गांगुलीला दिलेली जमीन परत घेणार, ममता सरकारकडून प्रक्रिया सुरु

(what is reason behind sourav ganguly’s heart attack?)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.