वायनाडमध्ये एवढ्या मोठ्या भुस्खलनाचे कारण काय? आपलं कुठं चुकतंय?
वायनाडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले की ज्यामुळे २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनही काही लोकं बेपत्ता आहेत. भुस्खलन कशामुळे होते? भुस्खलन रोखण्यासाठी आपल्याकडे कोणती यंत्रणा आहे का? आहे तर मग तिने आधीच याचा इशारा दिला होता. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून शोधणार आहोत.

केरळमध्ये भुस्खलनात आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोकं अजूनही बेपत्ता आहेत. या आकड्यावरुन ही घटना किती धक्कादायक आहे हे दिसून येतंय. आपल्या देशात लोकांची जीव सर्वात स्वस्त झाला आहे. ज्या घटना रोखता येऊ शकतात त्या घटना फक्त सिस्टमच्या नाकारतेपणामुळे घडतात. 2010 मध्ये सरकारने एका समितीची स्थापना केली होती. 2011 मध्ये या गाडगीळ कमिटीने जो रिपोर्ट सादर केला त्या रिपोर्टमध्ये दोन मोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पहिली गोष्ट होती की, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील जो भाग समुद्र सपाटीपासून लागून आहेत. त्या भागात कमीत कमी बांधकाम झाले पाहिजे. येथे जास्त इमारती असू नयेत, बोगदे नसावेत आणि रस्तांचं निर्माण होऊ नये. केरळसाठी ही गोष्ट अधिक महत्त्वाची होती. कारण केरळमध्ये भुस्खलनचा धोका जास्त आहे. केरळमधील 20 टक्के टेकड्या अशा आहेत ज्या 20 डिग्रीच्या कोनात झुकलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा बांधकाम होतं. तेव्हा भुस्खलनचे प्रमाण वाढते. कमीत कमी या ठिकाणी खनन केले जावे असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. पण...
