AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SALUTE | तीन वर्षांची असताना वडिलांचे छत्र हरपलं, त्यांचा गणवेश घालून ती झाली सैन्यात दाखल

दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत वडील मेजर नवनीत वत्स यांना देशाने गमावले. ते ही त्या वेळी जेव्हा ती अवघ्या 3 वर्षांची होती. आता ती ही भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाली. मात्र, लष्करात सुरु होताना तिने वडिलांचा गणवेश धारण केला होता.

SALUTE | तीन वर्षांची असताना वडिलांचे छत्र हरपलं, त्यांचा गणवेश घालून ती झाली सैन्यात दाखल
INAYAT VATS IN ARMYImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Mar 09, 2024 | 10:47 PM
Share

नवी दिल्ली | 9 मार्च 2024 : मेजर नवनीत वत्स यांनी 20 वर्षांपूर्वी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले होते. त्यावेळी त्यांनी विचारही केला नव्हता की आपली मुलगी आपला वारसा पुढे नेईल. कारण त्यावेळी तिचे वय अवघे 3 वर्ष होते. मात्र, त्याच तीन वर्षाचा मुलीने वडिलांप्रमाणेच सैन्यात रुजू होण्याचा निर्णय घेतला. कठोर मेहनत घेऊन ती भारतीय लष्करात रुजू झाली. पण, याचवेळी एक हृदयस्पर्शी घटना घडली. सैन्यात भरती होताना त्या मुलीने वडिलांचा गणवेश परिधान केला होता. वडिलांच्या हौतात्म्यानंतर सुमारे 20 वर्षांनी लेफ्टनंट इनायत वत्स सैन्यात दाखल झाल्या आहेत.

दिल्लीतील पदवीधर आणि हरियाणाची रहिवासी असलेल्या इनायत वत्स या शनिवारी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या. इनायत तीन वर्षांच्या असताना त्यांचे वडील मेजर नवनीत वत्स एका दहशतवादी कारवाईत शहीद झाले. वडिलांच्या आठवणीत त्यांनी एक एक दिवस काढला. लहानपणीच त्यांनी वडिलांसारखेच सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. अत्यंत कठोर मेहनत आणि परिश्रम यांच्या बळावर त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळविला.

तिसरी पिढी सैन्यात आहे…

लेफ्टनंट इनायत वत्स यांचे वडील मेजर नवनीत वत्स यांना 2003 मध्ये प्राण गमवावे लागले. काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईत त्यांचा सहभाग होता. इनायत ही त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी सैन्यात आहे. इनायत यांचे आजोबाही सैन्यात कर्नल पदावर होते. नवनीत वत्स यांनी ऑपरेशन दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर सेना पदक प्रदान करण्यात आले आहे.

त्या ऑफरवरून सैन्यात दाखल झाल्या

इनायत वत्स या दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजच्या पदवीधर आहेत. तर, हिंदू कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. इनायत वत्स या भारतीय लष्करात भरती होण्याचा खास प्रसंगी त्यांनी वडिलांचा गणवेश परिधान करून आल्या होत्या. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्या चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये (OTA) गेल्या होत्या. हरियाणा सरकारने शहीद कुटुंबाबाबतच्या धोरणानुसार त्यांना राजपत्रित पदाची ऑफर दिली होती. मात्र तिने ती नाकारली.

मुलीच्या निर्णयाबद्दल आई काय म्हणाली?

वडील नवनीत वत्स यांना आदर्श मानणाऱ्या इनायतचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते आणि तिने ते साध्य केले. आई शिवानी यांनी मुलीच्या निर्णयाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, ‘ती एका धाडसी माणसाची मुलगी आहे. इनायतने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर राज्य सरकारने दिलेल्या नोकरीत रुजू होईल असे वाटत होते. मात्र, तिने सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.’

शिवानी 27 वर्षांच्या असताना पती शहीद झाले. त्यावेळी लग्नाला फक्त चार वर्ष झाली होती. चंडीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. एकदा इनायतने त्यांना विचारले, ‘मी मुलगा असते तर तू काय केले असते?’ त्यावेळी सांगितले होते की, त्याला एनडीए किंवा आयएमएमध्ये सामील होण्यास सांगितले असते. आज माझ्या मुलीने तेच केले याचा आनंद आहे, असे त्यांनी सांगितले.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.