AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही घ्या संपूर्ण आकडेवारी, कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्या आणि किती लसी फुकट गेल्या?

लसी फुकट जाण्याचे प्रमाण इतर राज्यांमध्ये कितीतरी अधिक आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले होते. | Covid vaccine

ही घ्या संपूर्ण आकडेवारी, कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्या आणि किती लसी फुकट गेल्या?
व्हॅक्सिन हा शब्द कोठून आला? तर, मेरियम-वेबस्टर शब्दकोष म्हणते की व्हॅक्सिन हा शब्द प्रथम 1882 मध्ये वापरला गेला होता. हा शब्द लॅटिन भाषेतील 'व्हॅक्सिनस' (Vaccinus) या स्त्रीलिंगी शब्दापासून आला आहे. या शब्दाचा अर्थ 'गाईपासून निर्माण झालेला' असा होतो.
| Updated on: Apr 12, 2021 | 12:30 PM
Share

नवी दिल्ली: सध्या कोरोना लसींच्या वाटपावरून केंद्र सरकार विरुद्ध असा वाद पेटलेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा (Covid vaccine) पुरवठा करावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. मात्र, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला कशाबशा 17 लाख लसींचा साठा दिला. (Which state got how many covid vaccine doses and how many doses are wasted vaccination in Maharashtra Gujrat, UP, Delhi and Bihar)

त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकाच्या लसवाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले होते. महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिया रुग्णांची संख्या जास्त असतानाही तुलनेने कमी रुग्ण असलेल्या गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना कोरोना लसवाटपात केंद्र सरकार झुकते माप देत असल्याचा आरोप महाविकासआघाडी सरकारने केला होता.

महाविकासआघाडी सरकारच्या या आरोपाचा प्रतिवाद करताना केंदीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्राने लसी फुकट घालवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांचीच री ओढत महाराष्ट्र सरकारच कसे फोल ठरले आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉ. हर्षवर्धन हे फुकट गेलेल्या लसींची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवत आहेत, असा प्रत्यारोप केला होता. लसी फुकट जाण्याचे प्रमाण इतर राज्यांमध्ये कितीतरी अधिक आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले होते.

कोणत्या राज्याने किती लसी फुकट घालवल्या?

कोरोनाची लस देताना काही लसी फुकट जात आहेत. लसीची बाटली फुटणे, कोल्ड चेन तुटणे, एक्स्पायरी डेट संपणे, लस फोडल्यानंतर विशिष्ट वेळेत त्याचा वापर न होणे, अशा अनेक कारणांमुळे लसी फुकट जात आहेत. त्यावरुन सध्या बरेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या माहितीनुसार, तामिळनाडू (12.4 टक्के), हरियाणा (10 टक्के) आणि बिहारमध्ये (8.1 टक्के) कोरोना लसींचा सर्वाधिक अपव्यय झाला आहे. तर दिल्ली (7 टक्के), आंध्र प्रदेश (7.3 टक्के), पंजाब (8 टक्के), आसाम (7.3 टक्के) आणि मणीपूरमध्ये 7.2 टक्के लसी फुकट गेल्या आहेत.

राज्यआतापर्यंत किती लसी मिळाल्या?आणखी किती लसी मिळणार?
आंध्र प्रदेश 3,794,920 1,458,170
बिहार 4,644,080 1,096,890
उत्तर प्रदेश 9,209,330 4,798,450
उत्तराखंड 1336,100
ओदिसा 4,344,140 200,000
मध्य प्रदेश 5,819,530 3,376,220
महाराष्ट्र 10,619,190 1,943,280
राजस्थान 10,495,860 383,260
जम्मू-काश्मीर 1,351,600 160,240
झारखंड 2,474,340 2,047,610
पश्चिम बंगाल 8,383340 2,105,970
छत्तीसगढ 4,666,550
दिल्ली 2,370,710 200,000
गुजरात 10,519,330
पंजाब 2,236,770
आसाम 1,781,080 818.740
कर्नाटक 7,057,900 1377,560
हिमाचल प्रदेश 1,116,990 193,160
हरियाणा 3,042,220 1,992,150
केरळ 5,606,790 974,710
तेलंगणा 2 599,230 362280
चंदीगड 180,930
गोवा 180,930
तामिळनाडू 5,428,950 221.440

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राला कोरोना लसीचा मुबलक पुरवठा का नाही?, सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine हॅशटॅग ट्रेंडमध्ये

(Which state got how many covid vaccine doses and how many doses are wasted vaccination in Maharashtra Gujrat, UP, Delhi and Bihar)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.