महाराष्ट्राला कोरोना लसीचा मुबलक पुरवठा का नाही?, सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine हॅशटॅग ट्रेंडमध्ये

सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:44 AM, 9 Apr 2021
महाराष्ट्राला कोरोना लसीचा मुबलक पुरवठा का नाही?, सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine हॅशटॅग ट्रेंडमध्ये
#MaharashtraNeedsVaccine सोशल मीडियावर ट्रेंड

मुंबई : राज्यात सध्या कोरोना लसीचा (Corona Vaccine) तुटवडा जाणवतोय. राज्यातल्या शहरी आणि ग्रामीण इथून पुढचे 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे, अशी माहिती खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीच दिली आहे. राज्यात कालपासून अनेक भागात कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. तर पुण्यातही काही लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्यामुळे अनेक नागरिकांना लस न घेताच परतावं लागत आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर #MaharashtraNeedsVaccine असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय. (MaharashtraNeedsVaccine hasgtag Tweeter trend Corona Vaccine Maharashtra Supply Issue )

महाराष्ट्राला कोरोना लसीची गरज आहे म्हणजेच #MaharashtraNeedsVaccine या हॅशटॅगखाली नेटकरी ट्विटरवर आपली मत मांडत आहे. जवळपास 60 हजार लोकांनी या हॅशटॅगअंतर्गत ट्विट केली आहेत.

लसीचा तुटवडा, राजकारणाला ऊत

राज्यात 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे कोरोना लस आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन आता राज्यात जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे.

राजकीय नेत्यांचे ट्विट

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या नेत्यांनी कोरोना लसीच्या तुटवड्यावर ट्विट करुन आपापली मतं मांडली आहेत.

कुठे कुठे लसीचा तुटवडा, राज्यातली परिस्थिती काय?

मुंबई, कोकणात 2 दिवस पुरेल इतकाच साठा

मुंबईतही बीकेसी सारख्या मोठ्या कोविड सेंटरमध्ये फक्त 5 हजार लसींचा साठा शिल्लक होता. आज (शुक्रवार) सर लस आली नाही तर हे लसीकरण केंद्र बंद ठेवावं लागणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. शासकीय रुग्णालयातही लस उपलब्ध नाही. लसीकरण केंद्रांवरुन अनेक नागरिक लस न घेतात परत जात आहे. रत्नागिरी, चिपळूण, दापोली, गुहागर तालुक्यातही हिच स्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उद्यापर्यंत पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगलीत लसीकरण केंद्र बंद

तिकडे कोल्हापुरात आज फक्त दोनच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होती. लसी अभावी शहरातील 9 केंद्र बंद करावी लागली आहेत. लस घेण्यासाठी लोकांची धडपड पाहायला मिळतेय. पण लसीचा साठाच शिल्लक नसल्यानं नागरिकांना केंद्रावरुन लस न घेताच माघारी परतावं लागत आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात कालपासूनच लसीकरण पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

गोंदिया जिल्ह्यातही आता पुढील चार दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागणार आहेत. तर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातही उद्यापर्यंत पुरेल एवढेच लसीचे डोस उपलब्ध आहेत. राज्यातील बहुतांश भागात हिच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

(MaharashtraNeedsVaccine hasgtag Tweeter trend Corona Vaccine Maharashtra Supply Issue)

संबंधित बातम्या :

Maharashtra Needs Vaccine : पुणे, सातारा, सांगली, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांचं शटर डाऊन!

‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचा अपमान, माफी मागा’, नाना पटोले आक्रमक

गुजरातची लोकसंख्या आपल्यापेक्षा निम्मी, तरी त्यांना जास्त लसींचा साठा, संयमी राजेश टोपे कडाडले