AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेस्ट हाऊसमध्ये कपडे बदलतांना विद्यार्थिनीचे लक्ष गेले CCTV कॅमेरावर, नंतर धक्कादायक प्रकार उघड!

CCTV कॅमेरात विद्यार्थिनींचा कपडे बदलतांनाचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. जाणून घ्या कुठे घडला हा प्रकार

गेस्ट हाऊसमध्ये कपडे बदलतांना विद्यार्थिनीचे लक्ष गेले CCTV कॅमेरावर, नंतर धक्कादायक प्रकार उघड!
हेच ते गेस्ट हाऊस Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 09, 2022 | 4:16 PM
Share

वाराणसी, चंदीगड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनीच्या आंघोळीचे व्हिडीओ प्रकरण ताजेच असताना तसाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  वाराणसीतील परेड कोठी येथील गेस्ट हाऊसमध्ये (Varanasi Gust House) विद्यार्थिनींचे कपडे (Student Changing Cloth) बदलतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद (Record Video In CCTV)  झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या गटाने त्यांच्या खोलीत सीसीटीव्ही लावल्याचा आरोप केला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून हॉटेलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला व सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

असा लक्षात आला प्रकार

हे प्रकरण थाना सिग्राच्या कँट भागात असलेल्या गेट्स हाऊसचे आहे, जिथे पश्चिम बंगालमधील एका संस्थेतील विद्यार्थिनी थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर काही तासांनी एकच गोंधळ उडाला. त्यांना थांबवण्यात आलेल्या हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. विद्यार्थिनी त्या हॉलमध्ये कपडे बदलत असताना त्यांची नजर कॅमेऱ्यावर पडली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

तपासात आढळले पुरावे

एसीपी वरुणा झोन विकास श्रीवास्तव यांनी सांगितले की, गेस्ट हाऊस संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू आहे. जेपी गेस्ट हाऊसचे सीसीटीव्ही आणि डीव्हीआर जप्त करण्यात आले आहेत. कपडे बदलण्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्राप्त झालेली तक्रार योग्य असल्याचे आढळून आले आहे. मात्र ही बाब ज्या परिसरात उघडकीस आली त्या परिसरात अशी अनेक हॉटेल्स असून ती कोणत्याही परवान्याशिवाय सुरू आहे. या प्रश्नावर प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले असल्याने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...