AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लाय दुबई विमानाला वाचवणारे ते दोन पायलट कोण ? कॅप्टनने दरवाजा खोलताच आत गेले ताबा घेतला

दुबई ते इस्रायला जाणाऱ्या विमानात हायजॅकचा प्रयत्न झाल्याच्या घटनेच्या तीन दिवसानंतरही फ्लाय दुबईने या दोन्ही पायलटचे नाव सार्वजनिक केलेले नाही. त्यामुळे हे आता या घटनेचे सर्वात महत्वाचे आणि रहस्यमयी कॅरेक्टर बनले आहेत.

फ्लाय दुबई विमानाला वाचवणारे ते दोन पायलट कोण ?  कॅप्टनने दरवाजा खोलताच आत गेले ताबा घेतला
FLY DUBAI PLANE
| Updated on: Oct 04, 2026 | 9:20 PM
Share

दुबईहून इस्रायलला जात असलेल्या फ्लाय दुबईच्या फ्लाईटमध्ये को-पायलटने भारतीय पायलटवर हल्ला तेव्हा विमान वेगाने खाली येऊ लागले. त्यावेळी जखमी कॅप्टन स्मित मच्छर यांनी कसे तरी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यावेळी विमानातच असलेल्या दोघा पायलटनी कॉकपिटमध्ये पोहचून विमानाचा ताबा घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे दोन पायलट कोण आणि त्यांची नावे का गुप्त ठेवली जात आहेत असा सवाल केला जात आहे.

AP च्या मते विमानाचा कंट्रोल पुन्हा आणण्याचा प्रयत्न केल्यानंतरही या दोन पायलटनी प्रवाशांशी कोणताही संवाद साधला नाही. यामुळे प्रवासी आणखीन घाबरले. त्यांना माहिती नव्हते की कॉकपिटमध्ये कोण आहे.आणि विमानाला कोठे नेले जात आहे. काही प्रवाशांनी भीती सतावत होती की विमानाला हायजॅक करुन इराणला तर नेले जात नाही ना. सुमारे ४५ मिनिटांनंतर पायलटनी सांगितले की विमानला सौदी अरब येथील तबुक येथे उतरवले जात आणि सर्वकाही ठीक आहे. त्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. फ्लाय दुबईने या दोन्ही पायलटची नावे अजून सांगितलेली नाहीत. एअरलाईनने केवळ एवढेच सांगितले की दोन्ही क्रु मेंबर होते आणि त्यावेळी ते विमानात प्रवास करत होते.

कॅप्टनवर हल्ला होताच अफरातफरी

विमानात पुढे बसलेला प्रवासी डेनियल श्लिक्टर याने एपी वृत्तसंस्थेला सांगितले की कॉकपिटमधून ओरडण्याचे आवाज ऐकून प्रवाशांना समजले की काही गंभीर घडले आहे. त्यांच्या मते को-पायलट सहकारी पायलटवर सतत हल्ला करत होता.

कॅप्टन स्मित प्रचंड जखमी झाले होते. आणि कॉकपिटमध्ये रक्ताचा सडा पडला होता. त्यानंतरही कॅप्टन स्मित यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. एका प्रवाशाने को-पायलट पकडून बाहेर खेचले. तर उर्वरित प्रवाशांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवले. यावेळी एक अतिरिक्त पायलट वेगाने कॉकपिटमध्ये पोहचला आणि त्याने कंट्रोल सांभाळला. प्रवासी डेनियल श्लिक्टर याच्या मते काही वेळानंतर दुसरा पायलट देखील आत पोहचला. दोघांनी दरवाजा बंद केला.

विमानाला पुन्हा दुबई घेऊन जाण्यासाठी सज्ज होते पायलट

सुरुवातीला प्रवाशांना माहिती नव्हते की हे दोन पायलट विमानात का बसले होते. त्यांना नंतर कळले की त्यांना तेल अविवहून दुबईला जाणाऱ्या विमानाची ड्युटी होती. त्यामुळे ते आधीच विमानात बसुन प्रवास करत होते.

एव्हीएशनमध्ये ड्युटीसाठी कोणा दुसऱ्या जागी जाणाऱ्या पायलटच्या या प्रवासाला ‘डेडहेडिंग’ म्हटले जाते. म्हणजे त्यावेळी हे दोन अतिरिक्त पायलट प्रवासी म्हणून प्रवास करत होते. परंतू इमर्जन्सी होताच त्यांनी कॉकपिटमध्ये शिरुन विमानाला त्वरित सांभाळले.

विमानावर नियंत्रण मिळवण्यास 10 मिनिटांहून जास्त काळ

दोन्ही पायलटच्या कॉकपिटमध्ये शिरल्ययानंतर विमानाला स्थिर करण्यात सुमारे १० मिनिटाहून अधिक वेळ लागला. त्याआधी विमान वेगाने खाली आले होते. त्याचा पाठचा भाग क्षतिग्रस्त झाला होता.

पायलटनी मे-डे कॉल केला आणि सुरक्षित लँडिंगसाठी जागा शोधणे सुरु केले. त्यानंतर विमानाला सौदी अरबच्या तबुकमध्ये उतरवण्यात आले. विमानाला सुरक्षित उतरवल्यानंतर प्रवासी डेनियल श्लिक्टर याने दोघा पालयटचे कौतूक केले. त्याने या संपूर्ण घटनेला चमत्कारच म्हटले. त्याच्या मते पहिल्यांदा कॉकपिटमध्ये गेलेल्या पायलटने वेळ न दवडता परिस्थिती समजली आणि कंट्रोल सांभाळला. प्रवासी डेनियल श्लिक्टर म्हणाले की प्रवाशांचे प्राण वाचवण्यात या दोन पायलटची भूमिका खूप महत्वाची होती.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात