AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens Reservation Bill : मोदी सरकारचं कधी कुठलं विधेयक पडलं नाही, मग महिला आरक्षण बिलाच्या बाबतीत काय गडबड झाली, जाणून घ्या

Womens Reservation Bill : संसदेत भाजपंकडून विचारपूर्वक, रणनिती आखून विधेयकं मांडली जातात. मग, महिला आरक्षण म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयकाच्या बाबतीत काय चुकलं? ते हे विधेयक का मंजूर करुन घेऊ शकले नाहीत?

Womens Reservation Bill : मोदी सरकारचं कधी कुठलं विधेयक पडलं नाही, मग महिला आरक्षण बिलाच्या बाबतीत काय गडबड झाली, जाणून घ्या
Womens Reservation Bill
| Updated on: Apr 18, 2026 | 8:44 AM
Share

लोकसभेत शुक्रवारी एक मोठी घटना घडली. केंद्र सरकारने महिला आरक्षण म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं. पण हे विधेयक दोन तृतीयांश बहुमत नसल्यामुळे पडलं. मोदी सरकारचं हे असं पहिलं विधेयक आहे, जे ते मंजूर करुन घेऊ शकलेले नाहीत. संसदेत भाजपंकडून विचारपूर्वक, रणनिती आखून विधेयकं मांडली जातात. मग, या विधेयकाच्या बाबतीत काय चुकलं? ते हे विधेयक का मंजूर करुन घेऊ शकले नाहीत?. संसदेत मोदी सरकारचं गणित कसं गडबडलं? जाणून घ्या.

लोकसभेत साधारण बिल पास करणं एक वेगळी गोष्ट आहे. पण महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमनसाठी संविधानात संशोधन करावं लागणार आहे. संविधानात बदल करण्यासाठी विशेष बहुमत म्हणजे दोन तृतीयांश मतांची गरज लागते. भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA कडे बहुमत तर आहे. पण दोन तृतीयांश जादूई आकड्यापर्यंत पोहोचण्याची शक्ती नाहीय. अशावेळी हे बिल पास करवून घेण्यासाठी सरकारला विरोधी पक्षाच्या सहकार्याची आवश्यकता होती. जे त्यांना नाही मिळालं.

त्या विधेयकात काय अट होती?

जनगणना आणि सीट्सच परिसीमन झाल्यानंतरच महिला आरक्षण लागू होईल अशी त्या विधेयकात अट होती. सरकारने परिसीमनचं गणितही समजावलं. पण विरोधी पक्ष त्यासाठी तयार झाला नाही. ‘सरकार परिसीमनाच्या माध्यमातून एक राजकीय कट रचत आहे’ असा काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आरोप केला.

समाजवादी पार्टीकडून मुस्लिम महिलांसाठी वेगळ्या आरक्षणाची मागणी

हे विधेयक मंजूर झालं असतं, तर महिला आरक्षणाचा एक कोटा असणार होता. विरोधी पक्षांनी त्या कोट्याच्या आत आणखी स्पेशल कोट्याची मागणी केली होती. समाजवादी पार्टीने मुस्लिम महिलांसाठी वेगळ्या आरक्षणाची मागणी केली. काँग्रेसने 33 टक्के महिला आरक्षणामध्ये OBC महिलांसाठी स्वतंत्र कोट्याची मागणी केली. या विधेयकाला जातीय जनगणनेशी जोडण्याची मागणी केली. सरकारने स्पष्ट केलं की, धर्माच्या आधारावर आरक्षणाची देण्याची तरतूद संविधानात नाहीय. ओबीसी आरक्षणाची मागणी देखील सरकारने मान्य केली नाही.

दक्षिण विरुद्ध उत्तर असं नॅरेटिव

जेव्हा या विधेयकावर चर्चा सुरु झाली तेव्हा दक्षिण विरुद्ध उत्तर असं नॅरेटिव सेट करण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण भारतातील राज्यांना भिती आहे की, लोकसंख्येच्या आधारावर परिसीमन झालं, तर लोकसभेतील त्यांच्या सीट्स कमी होतील. जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर भारतातील राज्यांचं लोकसभेत वर्चस्व वाढेल. DMK सारख्या विरोधी पक्षांनी हे दक्षिणेविरोधात कारस्थान आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यामुळे महिला आरक्षण विधेयक संसेदत पडलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...