AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 मध्ये मोदी यांच्या नेतृत्वात भाजप लोकसभेत 300 चा आकडा पार करू शकणार का?

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला ३२६ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली. याचा अर्थ भाजपला बहुमतापेक्षा ५४ जागा जास्त मिळताना दिसत होत्या.

2024 मध्ये मोदी यांच्या नेतृत्वात भाजप लोकसभेत 300 चा आकडा पार करू शकणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Feb 19, 2023 | 11:27 AM
Share

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीला फक्त एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहे. मिशन २०२४ अंतर्गत भाजपने ३०० पेक्षा जास्त लोकसभेत जागा जिंकता याव्यात यासाठी मिशन सुरू केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप किती जागा लोकसभेत जिंकणार. हे समजण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत तीन सर्व्हे करण्यात आले. सी व्होटर आणि इंडिया टुडेने लोकसभा निवडणुकीसंदर्भात मूड ऑफ द नेशन नावाने सर्व्हे केला. यात १ लाख ३९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला. लोकसभा निवडणुकीबाबत कोणत्या पक्षात कसा माहौल आहे, हे समजण्यासाठी हा सर्व्हे ताजा आहे. याच्या आकड्यांचं आपण विश्लेषण करू. यापूर्वी आणखी दोन सर्व्हेचे आकडे पाहुया.

सहा महिन्यांपूर्वीचा सर्व्हे

सी व्होटरचा मूड ऑफ द नेशनचा सहा महिन्यांपूर्वीचा सर्व्हे होता. ऑगस्ट २०२२ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार, भाजपने २८३ जागा मिळतील, असा अंदाज होता. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला ३०७ जागा मिळतील असं सांगण्यात आलं होतं. २०१९ च्या तुलनेत एनडीएच्या २० जागा कमी दाखवण्यात आल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या.

भाजपला फायदा होताना दिसला

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला ३२६ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली. याचा अर्थ भाजपला बहुमतापेक्षा ५४ जागा जास्त मिळताना दिसत होत्या. २०१९ च्या तुलनेत भाजपला २३ जागांचा फायदा होताना दिसला.

सध्याच्या सर्व्हेचे आकडे काय सांगतात

२०२३ च्या सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार आता निवडणुका झाल्यास पुन्हा एनडीएची सरकार बनेल. यावेळी या जागा २९८ पर्यंत खाली आल्यात. भाजपला २८४ जागा मिळण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या सहा महिन्यांपूर्वीच्या सर्व्हेनुसार, एक जागा वाढली. परंतु, एनडीएचे नुकसान होताना दिसले.

तीन सर्व्हेचा अभ्यास केल्यास भाजप सरकार बनवण्याची शक्यता जास्त आहे. भाजपला मिळणाऱ्या जागांची संख्या ३०० च्या जवळपास आहेत. हे सर्व्हे लोकसभा निवडणुकीच्या एका वर्षापूर्वीचे आहेत. त्यामुळे तोपर्यंत परिस्थिती कशी राहते, यावरही बरेचकाही अवलंबून आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.