AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारची सणासुदीच्या काळात मोठी भेट, जीएसटीत बदल केल्याने या वस्तू होणार स्वस्त

सध्या अमेरिकेच्या टॅरिफ नीतिची चर्चा भारतात होत आहे. त्यामुळे निर्यातीवर परिणाम होणार आहे. असं असताना मोदी सरकारने भारतीयांना मोठी भेट दिली आहे. जीएसटीत बदल केल्याने ऐन सणासुदीच्या काळात वस्तू स्वस्त होणार आहे. काय ते जाणून घ्या सविस्तर

मोदी सरकारची सणासुदीच्या काळात मोठी भेट, जीएसटीत बदल केल्याने या वस्तू होणार स्वस्त
मोदी सरकारची सणासुदीच्या काळात मोठी भेट, जीएसटीत बदल केल्याने वस्तू होणार स्वस्त
| Updated on: Sep 03, 2025 | 11:09 PM
Share

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जीएसटीतील 12 आणि 28 टक्के हे स्लॅब काढून टाकले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. आता फक्त 5 आणि 18 टक्के जीएसटी स्लॅब असणार आहे. त्यामुळे सर्व वस्तू या दोन स्लॅबच्या आतच बसणार आहे. म्हणजेच 28 टक्के जीएसटी असलेली वस्तू 18 टक्क्यांपर्यंत येणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे. दुसरीकडे लक्झरी आणि आरोग्याला हानिकारक असलेल्या वस्तूंसाठी एक वेगळा स्लॅब तयार केला आहे. हा 40 टक्के असणार आहे. युएचटी दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा आता शून्य जीएसटी स्लॅबमध्ये असतील. त्यामुळे सर्व सामन्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नव्या बदलाची अमलबजावणी 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ही माहिती दिली आहे.

एसी, वॉशिंग मशीन, 38 इंचापेक्षा मोठे टीव्ही, लहान कार इत्यादींवर आता 18 टक्के जीएसटी आकारला जाईल, तर पूर्वी त्यावर 28 टक्के जीएसटी आकारला जात होता. पान मसाला, सिगारेट, गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ, विडी यांना विशेष श्रेणीत ठेवण्यात आले असून 40 टक्के जीएसटी असणार आहे.. फ्लेवर्ड कार्बोनेटेड पेये देखील या स्लॅबमध्ये ठेवण्यात आली आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याबाबतचा सूतोवाच केला होता. पंतप्रधान ज्या सुधारणांबद्दल बोलले होते त्या दिशेने आम्ही काम केले आहे. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी दर सुसूत्रीकरणात सहकार्य केले आणि आम्ही हा निर्णय एकमताने घेतला आहे.

काय स्वस्त होणार

आरोग्य उपकरणे आणि 33 औषधांवर जीएसटी आकारला जाणार नाही. चष्मा आणि दृष्टीशी संबंधित उपकरणांवरही 5 टक्के जीएसटी असेल.सुक्या मेव्यांवरील म्हणजेच काजू, बदाम, पिस्ता, खजूर, मिश्र काजू, नारळ पाणी, सोया मिल्क ड्रिंक, फळांच्या रसावर आधारित पेय, दुधावर आधारित पेय यासारख्या पॅकेज्ड पेय, पास्ता, नूडल्स, कॉर्नफ्लेक्स, फ्रूटेड राईस, बिस्किटे, केक, पेस्ट्री, नमकीन, भुजिया, इत्यादींवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. संगमरवरी, चामडे, शेतकरी आणि त्यांच्या उत्पादनांवर आकारण्यात येणारा 12 टक्के जीएसटी देखील 5 टक्के करण्यात आला आहे. आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसींवरील जीएसटीमध्येही मोठी सवलत देण्यात आली आहे. शूज आणि कपड्यांवरही मोठी सवलत देण्यात आली आहे. आता त्यावर 12 टक्क्यांऐवजी फक्त 5 टक्के जीएसटी आकारला जाईल.

काय महाग होणार

लक्झरी वस्तू, कार आणि बाईक अधिक महाग होतील. कारण नव्या स्लॅबमध्ये यांना विशेष स्लॅब देण्यात आला आहे. तंबाखू, जर्दा, पान मसाला, फ्लेवर, फ्रूट ड्रिंक आणि इतर पॅकेज्ड पेये महाग होतील. 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक महाग होतील.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.