AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT Summit 2026: जगातील संघर्षातही चमकतोय भारत, प्रतिभांचे जागतिक केंद्र बनलाय भारत – रामू राव जुपल्ली

WITT Summit 2026: दिल्लीत आज टीव्ही 9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026' च्या समिटचा प्रारंभ आज मोठ्या थाटात झाला. समिटच्या पहिल्याच दिवशी 'माय होम ग्रुप'चे एक्झुकेटिव्ह व्हाईस चेअरमन रामू राव जुपल्ली यांनी सांगितले की जगात अनेक प्रकारची संकटे येत असताना, आर्थिक घुसळण होत असताना भारत एक उत्तम उदाहरण म्हणून जगाच्या पुढे येत आहे.संपूर्ण जग भारताला एका आशेने पाहात आहेत.

WITT Summit 2026: जगातील संघर्षातही चमकतोय भारत, प्रतिभांचे जागतिक केंद्र बनलाय भारत - रामू राव जुपल्ली
Ramu Rao Jupally
| Updated on: Mar 23, 2026 | 9:34 PM
Share

आपण आज इतिहासाच्या एका अशा रंजक वळणावर उभे आहोत, जेथे जगात अनेक संकटे येऊ घातली आहेत. संकटामुळे संपूर्ण जगात आर्थिक कोंडी झाली आहे. भारत देखील यापासून वाचलेला नाही.परंतू आपला देश काम करण्याच्या विशिष्ट पद्धती आणि संकल्पाचे उदाहरण म्हणून पुढे येत असल्याचे ‘माय होम ग्रुप’चे एक्झुकेटिव्ह व्हाईस चेअरमन रामू राव जुपल्ली यांनी सांगितले. टीव्ही ९ नेटवर्कच्या व्यासपीठावर व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट ( WITT ) च्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

जसे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की जग भारताच्या तरुणांकडे आशा आणि विश्वासाच्या नजरेने पाहात आहे. कारण भारत लोकशाही, लोकसंख्या आणि विविधतेची शक्ती आहे.

हे वास्तव आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम आहे की भारत वेगवेगळ्या क्षेत्रात आणि शासन व्यवस्थांमध्ये सकारात्मक नजरेने पाहात आहे.

इतिहास रचत आहे भारताची अर्थव्यवस्था

ते म्हणाले की भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर अग्रसर आहे. ही अर्थव्यवस्था लागोपाठी ७ टक्के वार्षिक वृद्धीवाली एकमेव प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे. मजबूत आर्थिक आधार आणि योग्यता आधारित धोरणांमुळे भारताने वास्तवात जगाच्या श्रम बाजाराला नवे रुप देत आहे.

भारताचे “डिजिटल फर्स्ट” मॉडेल खूप खास आहे कारण हे विकसित अर्थव्यवस्थेत सीमाऐवजी प्रतिभेचा शोध घेत आहे. हे माननीय पंतप्रधानांच्या तरुण आणि डिजिटल विकास नावाच्या दोन स्तंभामुळे शक्य झाले आहे. त्यांनी देशभरात कामकाजाला सोपे बनवले आणि देशातील राहणीमानाच्या पद्धतीत सुधारणा केली.

भारत टॅलेंटचे केंद्र

ते म्हणतात की वर्तमान जग स्किल्ड लेबरच्या कमतरतेशी लढत आहे. जर्मनीच्या जुन्या उद्योगांपासून कॅनडातील तांत्रिक केंद्रे आणि GCC क्षेत्राच्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्थापर्यंत क्वालिटी टॅलेंट म्हणजे गुणवत्तापूर्ण प्रतिभेची गरज आहे. भारतच एकमेव असा देश आहे जेथे या मागणीला पूर्ण करण्यास सक्षम आहे. तेही विनम्रता पूर्वक माझे मत आहे की भारताच्या लोकांच्या प्रतिभेची खासियत सात मोठ्या स्तंभावर टीकलेली आहे. या सर्व स्तंभाची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अलिकडच्या वर्षात सुरु केलेल्या नितीगत ढाच्याने सुरु झाली असेही रामू राव जुपल्ली यांनी सांगितले.

1- भारतीय लोकसंख्येचा फायदा: जेथे उर्वरित जग म्हातारे होत असताना भारत तरुणांचा देश बनला आहे. आपण जगातील प्रतिभेचे केंद्र बनलो आहोत. जहां बाकी

2- भाषेवर पकड: आपल्या इंग्रजी भाषेची क्षमता आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही ग्लोबल कॉर्पोरेट कल्चरमध्ये मिसळण्यास सक्षम बनवते.

3- STEM सेक्टरमध्ये दक्षता: आपण दरवर्षी STEM ग्रॅज्युएट्सची सर्वाधिक संख्या तयार करतो, जी सिलीकॉन व्हॅली पासून ते बंगलुरुपर्यंत इनोव्हेशनला प्रोत्साहन देते.

4- डिजिटल फर्स्ट आणि डाटा फ्रिडम:जगभरात आपला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर एक उदाहरण आहे. हे डेटा जनरेशनला पुढे नेत आहे. भारताचा डिजिटल पब्लिक गुड्स इकोसिस्टीम आता जगभरात एक उदाहरण बनले आहे.

5- भारतीयात ग्लोबल सिटीजन बनण्याची ताकत: आज भारताचे प्रोफेशनल्स जगाला आपल्या कॅनव्हासच्या रुपात पाहातात आणि एक ग्लोबल सिटीजन बनण्याची ताकद राखतात.

6- टेक्नोलॉजी माईंडसेट: भारताचे शिक्षित आणि उत्साही तरुणांचे विचार तंत्रज्ञानाला प्राथमिकता देणारे आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील भारतीयांचे सोशल मीडियावर सक्रीय असणे या गोष्टीचे उदाहरण आहे की भारताने कशाप्रकारे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.

7- भावनात्मक बुद्धिमत्ता (EQ): भारत भावनात्मक बुद्धिमता म्हणजे इमोशनल कोशेंटसाठी देखील ओळखला जातो. हे भारतीय प्रतिभांना संघर्ष आणि वाईट काळाचा मुकाबला करण्याची ताकद देते.

हे केवळ आपणच सांगत नाही तर जगातील सर्वात प्रभावशाली हस्ती भारतीयांवर विश्वास दाखवत आहेत. नवी दिल्लीमध्ये भारत- युरोपिय संघ मुक्त व्यापार कराराच्या समाप्ती दरम्यान जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांनी या बाबींना दुजोरा दिला आहे.

दुसऱ्या पिढीच्या व्यावसायिकाच्या रुपात मी या बदलाला प्रत्येक दिवशी पाहात आहे. माझ्या सारखे एक अब्जाहून अधिक भारतीय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक नव्या भारताचा उदय पाहात आहेत.

जागतिक मंचावर भारताला एक जागा मिळण्यासाठी मोदी यांच्या प्रयत्नांचे जगाने कौतूक केले आहे. भारताची सर्वात महत्वपूर्ण निर्यात त्याची बुद्धी, कल्पनाशीलता, इमानदारी आणि प्रभाव असेल. चला, आपण सर्व मिळू भारताला एक जागतिक प्रतिभा राजधानी बनवण्यासाठी प्रतिबद्ध होऊयात.

चला या क्षणाचा आपण सर्व लाभ उठवूया…जसे पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की हीच वेळ आहे. हीच वेळ आहे भारताची अनमोल वेळ आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?