दणका! हेअर कट चुकला, महिलेला 2 कोटीची नुकसान भरपाई देण्याचे आदेश, दिल्लीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलला झटका

उलटपक्ष हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनद्वारे सूचनांविरोधात केस कापल्यामुळे तिने तिची अपेक्षित असाइनमेंट गमावली आणि तिला मोठे नुकसान सोसावे लागले, ज्यामुळे तिची जीवनशैली पूर्णपणे बदलली आणि तिचे टॉप मॉडेल बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. तक्रारदार महिला तिचे मॉडेलिंग असाईनमेंट पुढे चालू ठेवण्याची योजना आखत होती, जी मुख्यतः केसांच्या उत्पादनांशी संबंधित होती आणि तिला चित्रपटातील भूमिका देखील ऑफर करण्यात आली होती.

दणका! हेअर कट चुकला, महिलेला 2 कोटीची नुकसान भरपाई देण्याचे आदेश, दिल्लीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलला झटका
उपहार आग प्रकरणात पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी अंसल बंधूंना सात वर्षांची शिक्षा
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 12:23 PM

नवी दिल्ली: सलूनमध्ये जाऊन वेगवेगळ्या हेअर कट करण्याची अनेकांना आवड असते. जो तो आपापल्या परीनं हेअर कटही करत असतो. पण सलून चालकानं आपल्या मनासारखी हेअर कट करून न दिल्यास दंड आकारल्याचं तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण हे खरं आहे. दिल्लीत अशी एक घटना उघडकीस आलीय. हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनद्वारे चुकीच्या पद्धतीनं केस कापल्याबद्दल महिलेला 2 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आलीय.

हॉटेल आयटीसी मौर्यकडून 2 कोटी रुपयांची भरपाई

2018 मध्ये हॉटेल आयटीसी मौर्य येथील सलूनमध्ये कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं केस कापल्याबद्दल आणि चुकीची ट्रिटमेंट दिल्याबद्दल एका महिलेला राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या मध्यस्थीनं हॉटेल आयटीसी मौर्यकडून 2 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आलीय. तक्रारदार महिला ही केस उत्पादनांसाठीची मॉडेल आहे. न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि डॉ. एस. एम. कांतीकर यांनी हा आदेश दिलाय. “स्त्रिया त्यांच्या केसांच्या बाबतीत अत्यंत सावध आणि काळजी घेतात, यात शंका नाही आणि त्यांनी केस चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी एक मोठा खर्च केलाय, यातही दुमत नाही. त्या भावनिकरित्या त्यांच्या केसांशी जोडलेल्या असतात. तिच्या लांब केसांमुळे तक्रारदार महिला ही हेअर प्रॉडक्टची मॉडेल होती. तिने VLCC आणि Pantene साठी मॉडेलिंग केलीय. पण उलटपक्ष हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनद्वारे सूचनांविरोधात केस कापल्यामुळे तिने तिची अपेक्षित असाइनमेंट गमावली आणि तिला मोठे नुकसान सोसावे लागले, ज्यामुळे तिची जीवनशैली पूर्णपणे बदलली आणि तिचे टॉप मॉडेल बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. तक्रारदार महिला तिचे मॉडेलिंग असाईनमेंट पुढे चालू ठेवण्याची योजना आखत होती, जी मुख्यतः केसांच्या उत्पादनांशी संबंधित होती आणि तिला चित्रपटातील भूमिका देखील ऑफर करण्यात आली होती. पण चुकीच्या हेअर कटमुळे तिला सर्व गमवावं लागलंय.

मागच्या बाजूने तिचे केस तळापासून 4 इंच कापण्याची सूचना

12 एप्रिल 2018 रोजी तिने हॉटेल आयटीसी मौर्य येथील सलूनला केस कापण्यासाठी भेट दिली, कारण त्यावेळी तिला एका असाइनमेंटला जायचे होते. महिलेने तिची नियमित हेअर स्टाइल करण्यास सांगितले. पण ती उपलब्ध नव्हती आणि त्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या आश्वासनावर तिला दुसऱ्या पद्धतीची हेअर स्टाइल देण्यात आली. ते पाहून संबंधित महिला अचंबित झाली. मागच्या बाजूने तिचे केस तळापासून 4 इंच कापण्याची सूचना असतानाही हेअर स्टाइलिस्टनं त्याहून जास्त इंच केस कापले. पण त्यामुळे तिला चांगली असाइनमेंट गमवावी लागली. तसेच केसांवरच्या उपचारांसाठी वापरलेल्या प्रोडक्टनंही तिच्या टाळूवर सूज आली आणि तिचं नुकसान झाल्याचंही निरीक्षण आयोगानं नोंदवलं.

ती तिच्या नोकरीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीये

तिचे केस अशा पद्धतीनं कापण्यात आल्यानं तिला गंभीर मानसिक धक्का बसलाय. ती तिच्या नोकरीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीये. आयटीसी हॉटेल्स लिमिटेडच्या चुकीमुळे तिला हा मनस्ताप सहन करावा लागतोय. गेल्या दोन वर्षांपासून ती महिला वेदना आणि आघात सहन करत आहे, असंही आयोगाने नोंदवले. या प्रकरणातील प्रतिवादींनीही युक्तिवाद केला. तक्रारदार महिलेनं नुकसानभरपाईचा केलेला दावा अतिशयोक्तीपूर्ण आणि कोणत्याही आधाराशिवाय आहे. तक्रारीमध्ये कोणताही आधार देण्यात आलेला नाही, ज्यावर नुकसानभरपाईचा दावा 3 कोटी रुपये असेल, असे प्रतिवादींनी म्हटलंय.

संबंधित बातम्या

आसाममध्ये पोलीस आणि स्थानिकांमध्ये राडा, 2 जणांचा मृत्यू, पोलीसही जखमी, सरकारकडून 800 घरांवर बुलडोजर!

पाकने भारतात अफगाण दहशतवादी पाठवले, मोठ्या हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी

Woman awarded Rs 2 crore compensation for wrong haircut by Hotel ITC Maurya

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.