पाकने भारतात अफगाण दहशतवादी पाठवले, मोठ्या हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी

सुत्रांच्या माहितीनुसार, ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या अफगाणी दहशतवाद्यांना भारतात आणलं, ते पुन्हा पाकिस्तानात शिरताना भारतीय सैन्यासोबत त्यांची झडप झाली.

पाकने भारतात अफगाण दहशतवादी पाठवले, मोठ्या हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी
भारतीय सैन्याकडून या अफगाणी दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरु
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 4:07 PM

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात सत्तेवर तालिबान आल्यानंतर आता भारतात अफगाणी दहशतवादी घुसल्याची बातमी समोर आली आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांनी याबाबत सरकारला अलर्ट जारी केला आहे. या संस्थांच्या माहितीनुसार, भारतात कुठल्यातरी मोठ्या हल्ल्याची शक्यता आहे. त्यातच मिलिट्री कॅम्प, मोठी सरकारी कार्यालयं यांना जास्त धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून भारताची सीमा पार करुन दिली जाऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या अफगाणी दहशतवाद्यांना भारतात आणलं, ते पुन्हा पाकिस्तानात शिरताना भारतीय सैन्यासोबत त्यांची झडप झाली. त्यानंतर ही गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं. ( Pakistan infiltrates Afghan terrorists across . Chance of a major attack. High alert issued by intelligence agencies )

दहशतवाद्यांसोबत झालेल्या या झडपेत एक भारतीय सैनिकही जखमी झाला आहे. माहितीनुसार, या अफगाणी दहशतवाद्यांकडे घातक शस्र आहेत. हेच नाही तर जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांकडून यांना मदत मिळत आहे. उरी सेक्टरच्या अंनगूर पोस्टजवळील सीमेच्या तारा कापून या अफगाणी दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत प्रवेश देण्यात आला आहे.

दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरु

भारतीय सैन्याकडून या अफगाणी दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. सीमेजवळ दहशतवादी कारवाया सुरु असल्याचं कळल्यानंतर शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. गेल्या 5 दिवसांपासून उरी सेक्टरमध्ये हा तपास सुरु आहे. असं असलं तरी या भागात मोबाईल आणि इंटरनेट सुविधा सुरु आहेत. मात्र सीमेजवळच्या भागातील दूरसंचार व्यवस्था सध्या ठप्प करण्यात आली आहे.

चकमकीत भारतीय जवान जखमी

एका सुरक्षा प्रवक्त्यांनी हे मान्य केलं की, शोध मोहिम सुरु आहे, मात्र याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवरच्या तारांजवळ पहिल्यांदा या दहशतवाद्यांशी सामना झाला, त्यात सैन्याचा एक जवान जखमी झाला, त्यानंतर हे दहशतवादी पळाले. याच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी उरी सेक्टरमध्ये सैनिक दिवसाची रात्र करत आहेत. उरीतून बाहेर पडणारे सगळ्या रस्त्यांवर चेकिंग सुरु आहे, जेणेकरुन हे दहशतवादी बाहेर पडू नयेत. ज्या भागात ही चकमक झाली आहे, तो भाग गोहलान जवळ आहे, हा तोच भाग आहे जिथं सप्टेंबर 2016 मध्ये उरी ब्रिगेडवर दहशतवादी हल्ला झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व अफगाणी दहशतवादी आहेत आणि सहजरित्या भारतीयांमध्ये मिसळू शकतात. त्यामुळे सैन्याकडून अधिक काळजी घेतली जात आहे. शंका असलेल्या ठिकाणांवर सैनिकी छापे पडत आहेत, आणि संशयावरुन अनेक लोकांची चौकशीही सुरु आहे.

हेही वाचा:

पाक-चीनला धडकी, अमेरिकेकडून भारत 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार, मोदींची ड्रोन निर्माता कंपनीच्या CEOसोबत बैठक

New Air Chief Marshal : एअर मार्शल व्ही.आर. चौधरी यांची पुढील हवाईदल प्रमुखपदी वर्णी

 

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.