AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mann Ki Baat : ‘मन की बात’ संमेलनात महिलेला प्रसूती वेदना; गोंडस बाळाला दिला जन्म

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम अधिक लोकप्रिय ठरला आहे. बघता बघता या कार्यक्रमाचे 100 भाग झाले आहेत. त्या निमित्ताने दिल्लीत एका संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एका महिलेला प्रसूती वेदना जाणवू लागल्या.

Mann Ki Baat : 'मन की बात' संमेलनात महिलेला प्रसूती वेदना; गोंडस बाळाला दिला जन्म
Mann ki BaatImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2023 | 2:05 PM
Share

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100व्या भागाच्या निमित्ताने राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्यावेळी स्वयं सहायता समूहाची सदस्य पूनम देवी यांना प्रसव पीडा होऊ लागली. त्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यातआलं. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळ आणि ही महिला सुखरूप आहे. बुधवारी विज्ञान भवनात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला काही विशेष आमंत्रितांना बोलावण्यात आलं होतं. त्यात ही महिलाही होती. मोदींच्या एका मन की बात कार्यक्रमात या महिलेने लखमीपुरी खीरी येथे स्वयं सहायता समूहाच्या सदस्य म्हणून केलेल्या कामाचा उल्लेख केला होता.

एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, पूनम ही नऊ महिन्याची गर्भवती होती. विज्ञान भवनातील संमेलनात भाग घेण्यासाठी ती आली होती. त्यावेळी तिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. तिने त्याबाबतची तक्रार करताच तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिने एका बाळाला जन्म दिला. ती आणि तिचं बाळ सुखरूप आहे. मुलाच्या जन्मानंतर ही महिला आपल्या गावाकडे गेली आहे, असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

अनन्यसाधारण योगदान

लखीमपूर खीरी येथील स्वयं सहायता समूहाकडून केळ्याच्या पानं आणि झाडापासून फायबरचा उपयोग करून हँडबॅग, चटई आणि अन्य वस्तू बनवल्या जातात. त्यामुळे गावातील महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यांचं उत्पन्नही वाढलं आहे. शिवाय हाताला कामही मिळालं आहे. संघर्षावर मात करून शून्यातून अस्तित्व निर्माण करणाऱ्या 100 लोकांचा पंतप्रधानांनी मन की बातमध्ये उल्लेख केला होता. त्या 100 जणांपैकी पूनम या एक होत्या.

उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मन की बात कार्यक्रमाचा आज 100 वा एपिसोड होता. त्यानिमित्ताने दिल्लीतील विज्ञान भवनात मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती तसेच प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यावेळी उपस्ंथित होते.

आज मन की बातच्या कार्यक्रमाचा 100 वा भाग दाखवण्यात आला. यावेळी ज्या लोकांनी छोट्या छोट्या उद्योगातून मोठी उद्योग निर्मिती केली. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करून आदर्श घालून दिला अशा लोकांशी मोदींनी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. तसेच आपल्या कार्यात प्रगती करण्याच्या शुभेच्छाही दिल्या.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.