जीन्स-स्कर्ट आणि शॉर्ट्स घालून आलात तर मंदिरात नो-एंट्री, फर्मान झालं व्हायरल

बालाजी मंदिर समितीने भाविकांसाठी तुघलकी फर्मान जारी केले आहे. या आदेशानुसार भाविकांनी हाफ पँट, बर्म्युडा, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फाटलेली जीन्स घालून मंदिरात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

जीन्स-स्कर्ट आणि शॉर्ट्स घालून आलात तर मंदिरात नो-एंट्री, फर्मान झालं व्हायरल
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 2:16 PM

मुझफ्फरनगर : बालाजी मंदिर समितीने (temple) भाविकांसाठी तुघलकी फर्मान जारी केले आहे. या आदेशानुसार पुरूष-महिला भाविकांनी हाफ पँट, बर्म्युडा, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फाटलेल्या जीन्स घालून (no jeans) मंदिरात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणत्याही महिलेने अथवा तरूणीने असे कपडे घातले असतील तर त्यांनी मंदिरात प्रवेश करू नये. अशा व्यक्तींना बाहेरूनच दर्शन घ्यावे. अशा सूचनावजा आदेश मंदिर समितीने मंदिराच्या आवारात व बाहेर लावले आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर शहरातील प्रसिद्ध बालाजी मंदिराच्या या आदेशामुळे खळबळ माजली आहे.

तसेच या सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्यात येईल असेही समितीने स्पष्ट केले आहे. एखादी व्यक्ती अव्यवस्थित अथवा अयोग्य कपडे घालून मंदिरात आल्यास त्या व्यक्तीला दंड ठोठावला जाईल. महिला आणि मुलींना साधे कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करता येणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाले तुघलकी फर्मान

बालाजी मंदिरातर्फे ही सूचनावजा फर्मान जारी करण्यात आल्यानंतर हे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मंदिर समितीच्या या पोस्टवर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या आदेशाची एक प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मंदिर परिसरात जीन्स, स्कर्ट टॉप आणि फाटलेले कपडे घालून मंदिरात येऊ नका, असे लिहिले आहे.

दुसरीकडे, या प्रकरणी मंदिराचे पंडित आलोक शर्मा म्हणतात की, मंदिरात दर्शनावेळी महिलांनी साडी आणि सलवार-कुर्ता घालूनच यावे. एवढेच नाही तर सर्व महिला आणि मुलींनी मंदिरात प्रवेश करताना डोक्यावर साडीचा पदर किंवा ओढणी घेऊन झाकून घ्यावे. पंडित म्हणाले की, कोणतीही महिला किंवा मुलीने नियम न पाळल्यास तिला आधी समजावून सांगितले जाईल आणि त्यानंतरही कोणी मंदिराचे नियम न पाळल्यास बालाजी मंदिर समिती दंडही आकारू शकते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.