सेक्स व्हिडीओ व्हायरल होताच त्यांचं जगणं मुश्किल, महिलांनी घर सोडलं; नवऱ्यांच्याच प्रश्नांनी वैतागल्या

प्रज्वल इथे मित्रांसोबत इथे पार्टीसाठी यायचा. त्याच्याशिवाय आम्हाला काहीच माहीत नाही. सेक्स स्कँडलचे व्हिडीओ आले. त्यात महिलांचे चेहरे दिसत आहेत. महिलांचे चेहरे दाखवणं योग्य नाही. चुकीचं आहे. आता त्या महिला गाव सोडून गेल्या आहेत. त्यांच्या घराला कुलूप आहे. त्या परत कधी येतील माहीत नाही. या महिलांना लहान लहान मुलेही आहेत, असं स्थानिक लोक सांगत आहेत.

सेक्स व्हिडीओ व्हायरल होताच त्यांचं जगणं मुश्किल, महिलांनी घर सोडलं; नवऱ्यांच्याच प्रश्नांनी वैतागल्या
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 1:48 PM

कर्नाटकातील जेडीएस नेता प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे. या सेक्स स्कँडलचे व्हिडीओ आल्यानंतर या प्रकरणात शिकार झालेल्या महिलांनी घर सोडलं आहे. अनेक महिला घर सोडून दुसरीकडे निघून गेल्या आहेत. नवऱ्यांनीच चारित्र्यावर सवाल केल्याने या महिलांनी अखेर वैतागून घर सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचे प्रज्वल हे नातू आहेत. हासन लोकसभा मतदारसंघातून प्रज्वल निवडणूक लढवत आहेत. संपूर्ण जिल्हा एचडी रेवन्ना यांच्या कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात ब्र शब्दही काढला तरी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाते आणि त्याचे परिणामही भोगावे लागतात. कारण त्यांच्या पक्षाचे आणि कुटुंबाचे असंख्य समर्थक या जिल्ह्यात असून तेच त्यांनी खबरी देत असतात, असं हगारे गावातील स्थानिकांचं म्हणणं आहे. एका वृत्तपत्राने तशी माहिती दिली आहे.

तक्रार करणारी महिला गायब

28 एप्रिल रोजी ज्या महिलेने प्रज्वल यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. ती महिला कुटुंबासह घर सोडून गेली आहे. ही महिला रेवन्ना यांच्या घरी काम करत होती. तिचे काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर तिच्या घराला कुलूप लावलेलं दिसलं. ती कुठे गेली, तिच्या कुटुंबाचं काय झालं? आम्हाला काहीच माहिती नाही, असं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे.

महिलांकडून फोटो डिलीट

प्रज्वल यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या एका माजी जिल्हा पंचायत सदस्याच्या गावचेही असेच हाल आहेत. एका स्थानिक जेडीएस नेत्याने याबाबत मौन सोडलं. तो म्हणाला की, पक्षातील महिला कार्यकर्त्या, नेत्या आणि पदाधिकारी प्रज्वल रेवन्ना यांच्यासोबतचे फोटो डिलीट करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. काही प्रकरणात नवरेच आपल्या पत्नीवर संशय घेत असून खासदाराशी असलेल्या संबंधाबाबत विचारत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अनेक महिलांचं आयुष्य बरबाद झालं आहे.

त्यांची लहान लहान मुले आहेत

सेक्स स्कँडलचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक महिलांची ओळख पटली आहे. त्यामुळे या महिलांनी हासन सोडून दुसरीकडे आश्रय घेतला आहे. एसआयटी जेव्हा हासनमध्ये चौकशीसाठी गेली, तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी धक्कादायक माहिती दिली. व्हिडीओतील महिलांना आम्ही ओळखतो. त्या इथेच राहतात. त्या पक्षात सक्रिय होत्या. पण आता त्यांच्या घराला कुलूप आहे. त्यांची लहान लहान मुलेही आहेत, असं हे लोक सांगत आहेत.

गुन्हा दाखल करायचा नव्हता

दरम्यान, सेक्स स्कँडलमधील महिलांचे चेहरे समोर आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिलांचे चेहरे दाखवणं योग्य नाही. हे चुकीचं आहे. आता त्या महिला गायब झाल्या आहेत. त्या कधी येतील हे माहीत नाही. या कुटुंबाला गुन्हा दाखल करायचा नव्हता. कारण रेवन्ना यांच्या विरोधात जाऊन हासनमध्ये राहणं मुश्किल आहे, असं एका दुकानदाराने सांगितलं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.