AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागतिक सिकलसेल दिनी दिल्लीच्या एम्समध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन, औषध विकसित करण्यासाठी मोठी घोषणा!

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जागतिक सिकलसेल दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मोठे निर्ण घेण्यात आले.

जागतिक सिकलसेल दिनी दिल्लीच्या एम्समध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन, औषध विकसित करण्यासाठी मोठी घोषणा!
world sickle cell day
| Updated on: Jun 19, 2025 | 9:54 PM
Share

World Sickle Cell Day : सिकलसेल हा असा आजार आहे, ज्याची अनेकांना फारशी माहिती नाही. मात्र या आजारामुळे रुग्णाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळाल्यास रुग्ण या आजाराशी उत्तमरित्या लढा देऊ शकतो. या आजाराविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी जगभरात जागतिक सिकलसेल डे साजरा केला जातो. केंद्रीय आदिवासी मंत्रालयानेही भगवान बिरसा मुंडा चेअरच्या सहकार्याने दिल्लीतील एम्समध्ये जागतिक सिकलसेल दिनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.

सिकलसेल आजाराचे आदिवासींमध्ये प्रमाण अधिक

सिकलसेल हा एक अनुवांशिक आजार आहे. यामुळे अॅनिमिया, तीव्र वेदना, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होणे, शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान होते. या आजारामुळे आर्युमानातही घट होते. हा आजार मुख्यत्वे: आदिवासी लोकांमध्ये दिसून येतो.

सिकलसेल अॅनिमियाच्या निर्मूलनसाठी 2023 साली अभियानाला सुरूवात

सिकलसेल अॅनिमियाचे निर्मूलन करण्याची मोहीम 1 जुलै 2023 रोजी मध्य प्रदेशातील शहडोल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चालू करण्यात आली. सिकलसेल अॅनिमिया या आजाराबाबत आदिवासी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालय  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत (MoHFW) काम करत आहे.

बिरसा मुंडा पुरस्काराची घोषणा

या कार्यक्रमात सिकलसेल अॅनिमिया या आजारावरील औषध विकसित व्हावे, त्याला प्रोत्साहन आणि चालना मिळावी यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे भगवान बिरसा मुंडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. एम्स रुग्णालयाअंतर्गत आदिवासी आरोग्य आणि संशोधन संस्थेसाठी प्रगत केंद्राची स्थापना करण्याचीही घोषणा करण्यात आली.

याआधी देशभरातील एम्स रुग्णालयांसह 15 टर्शियरी केअर हॉस्पिटल्समध्ये एससीडीचे अत्याधुनिक निदान आणि व्यवस्थापन प्रदान करणारे क्षमता केंद्र (सीओसी) विकसित करण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे.

सिकलसेल दिनाचे महत्त्व काय?

जगभरात 19 जून हा दिवस जागतिक सिकलसेल दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना या आजाराबद्दल समजावे, या आजाराचा परिणाम, त्याचे लवकर निदान आणि व्यवस्थापना याचे महत्त्व समजावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक सिकलसेल दिनाच्या पार्श्वभूमीवर 17 राज्यांत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.